हर्निया मूळव्याध निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिर
पी.आर. पोटे पाटील आयुर्वेद रुग्णालयात

अमरावती /10 फेब्रुवारी : पी.आर. पोटे पाटील आयुर्वेद रुग्णालय, अमरावती यांच्या वतीने 10 फेब्रुवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत या विशेष शिबिरात मुळव्याध, फिशर, भगंदर,पोटाचे आजार , मुत्रमार्गाचे विकार ,पायलोनाईडल सायनस ,हर्निया ,हायड्रोसिल, इतर शरीरावर कुठलीही चरबीची, घामाची गाठ, स्तनाच्या गाठी, कान शिवणे, (फाटलेले कान शिवणे), कुरुप काढणे, जखमेवर टाके मारणे, त्वचा विकार या व्याधी वर उपचार करून मार्गदर्शन केले या शिबिराला 98 पेशंट नि सहभाग घेतला व या शिबीर चे उद्घाटक म्हणून आयुर्वेद हॉस्पिटल चे प्राचार्य डॉ रणजित देशमुख हे उपस्थित होते तसेच या शिबिराला लाभलेले अमरावती येथील तज्ञ चिकित्सक डॉ. नितेश ना. सानप ,डॉ. अश्विनी अं खार्डे उपस्थित राहून रुग्णांची तपासणी, उपचार आणि आजाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिबीरचे सूत्र संचालन आणि आभार डॉ. निकिता लांडे यांनी केले.




