पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत, बंडखोरांशी संवाद साधणार
दिवसभर विविघ कार्यक्रम, जिप, पंस, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

अमरावती/1 जानेवारी – भाजपाचे निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता अमरावती दौर्यांवर येणार आहे. या दौर्यार्ंत ते मनपा निवडणुकीत बंडखोरी करणार्या 3 आणि उमेदवारीच्या कारणावरून नाराज झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.
नागपुरवरून त्यांचे अमरावती विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते अंबादेवी दर्शनासाठी जाणार आहे. महाआरती झाल्यानंतर ते उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करणार्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंत करणार आहे. याशिवाय उमेदवारी वाटपावरून मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते नाराज झाले आहे. या नाराज कार्यकर्त्यांशी ते संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करणार आहे. भाजपात सध्या मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. बुधवारी तो अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते जयंत डेहनकर व शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्यासोबत बाचाबाची करून व्यक्त केला होता. हा असंतोष असाच कायम राहू नये आणि त्याचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी पालकमंत्री बावनकुळे तातडीने अमरावती दौर्याावर येत आहे. या दौर्यानदरम्यान ते किती बंडखोरांना माघारी बोलवतात आणि नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी कशी करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
वलगावमध्ये पक्ष प्रवेश सोहळा-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी वलगाव येथील सिकची रिसोर्ट येथे आमदार राजेश वानखडे यांनी पक्ष प्रवेश सोहळा दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व बाजार समिती सभापती राहीलेला आणि जिल्हा बँक संचालक असलेला एक नेता भाजपात प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील भाजपात येणार असल्याची माहिती आहे.
रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांचा शहरात रोड-शो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 जानेवारी रोजी शहरात महापालिका निवडणुकीसाठी भव्य रोड शो करणार आहेत. गाडगे बाबा समाधीपासून शेगांव नाका, जयस्तंभ चौक, गांधी चौक मार्गे साईनगर गजानन महाराज मंदिरपर्यंत सुमारे 8 किलोमीटरचा उत्साहवर्धक प्रवास ठरवण्यात आला आहे. भाजपा पदाधिकारी मार्ग आणि कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत. मुख्यमंत्री सोबत मंत्री मंडळीही सहभागी होऊ शकतात. प्रचाराच्या प्रारंभीच रोड शो ठरवल्यामुळे राज्यस्तरीय तयारी अधोरेखित होते. अंतिम टप्प्यात 11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विशाल जनसभेला संबोधित करतील.

आ.रवी राणा यांच्याशी चर्चा करणार
अमरावतीतील परिस्थि तीवर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, आमदार रवी राणा यांच्याशी स्वतः भेटून चर्चा करणार असून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत, ते अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती करणार आहेत.




