सोमवारी संत जगनाडे महाराज जयंती निमित्त भव्य रॅली
जिला तैलिक समितीचे आयोजन

* 30 डिसेंबरला युवक-युवती परिचय मेळावा
अमरावती /4 डिसेंबर – महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा आणि अमरावती जिला तैलीक समितीने सोमवार 8 डिसेंबर रोजी श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव अंतर्गत भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेतील दिली.
यावेळी शंकरराव हिंगासपुरे, बाबासाहब शिरभाते, वसंतराव जामोदे, पांडुरंग सोनवाल, बळिराम ग्रेसपुंजे, अरविंद चौधरी, रामेश्वर गोदे, नामदेव गुल्हाने, मुरलीधर गडवाले, देविदास मावळे, गंगाधर आसोले, शिवदास बिजवे, प्रकाश शिरभाते, वसंतराव गुल्हाने, विजय हटवार, प्रा. गजानन गुल्हाने, इंजी. अरुण गुल्हाने, भास्कर श्रीराव, अशोक डोंगरे, सुरेश तर्हेकर, बाबुराव गुल्हाने, देवका बिजवे, किरण गुलवाडे आदि प्रमुख उपस्थित राहतील. अशी माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत अॅड. डॉ. संजय शिरभाते यांनी दिली. माहिती देतांना आयोजकांनी सांगितले की, 30 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सर्वशाखीय सांस्कृतिक भवनात सर्व शाखीय तेली समाजाच्या युवक-युवतींचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वधू-वर मेळाव्यात 1100 उपवर वर-वधू उपस्थित राहतील. या दरम्यानमल्टीकलर पुस्तिका प्रकाशित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय हिंगासपुरे, किशोर जिरापुरे, राजेश शिरभाते, ज्ञानेश्वर शिरभाते, केशवराव गुल्हाने, राजेश हजारे, प्रकाश बनारसे, दीपक गिरोळकर, सुरेश बिजवे, किशोर गाडबैल, दिलीप चौकडे, दिनेश बिजवे, संजय मांडवे, योगेश मावळे, सतीश गुल्हाने, अविनाश जसवंते, कैलास गिरोळकर, विवेक गुल्हाने, प्रशांत शिरभाते, विनोद गासे, नितिन हटवार, प्रा. प्रवीण गुल्हाने, प्रा. सतीश खोडे, संजय मापले, विजय शिरभाते, जयंत औतकर, सागर शिरभाते, चंदू जावरे, अमोल आगाशे आदि परीश्रम घेत आहेत.




