सोन्याचे दागीने लंपास : चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल
शहरातील मानकर बिल्डींग एलआयसी ऑफीस परिसरातील घटना

वरुड । 9 नोव्हेंबर – शहरातील मानकर बिल्डींग एलआयसी ऑफीस परिसरातील घरातुन अज्ञात चोऱटयाने सोन्याचे दागीने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
या प्रकरणी अज्ञात चोऱटयाविरु़दध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ श्रीराम मानकर (38) रा.मानकर बिल्डींग एलआयसी ऑफीस जवळ वरुड, ता.वरुड याने त्याच्या आईच्या खोलीत जावुन अलमारी पाहले असता सामान अस्त व्यस्त जमिनीवर पडलेले दिसले. बारकाईने पाहनी केले असता कानातील रिंग दिसुन आले नाही 02 सोन्याचे रिंग वजन 08 ग्रॅम किंमत अंदाजे 80 हजार रुपये कोणी तरी अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन चोरुन नेले आहे. या प्रकरणी फिर्यादी सौरभ श्रीराम मानकर (38) रा.मानकर बिल्डींग एलआयसी ऑफीस जवळ वरुड, ता.वरुड यांच्या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरु़दध भादंवि 305 भा.न्या.सं.2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलिस करीत आहे.




