तुम्ही चार नाही, आठ मुलं जन्माला घाला

नवनीत राणांवर ओवैसींचा जोरदार पलटवार

* अमरावतीत एमआयएमच्या प्रचारार्थ जाहीर सभा

* मुस्लीम बांधवांची तुफान गर्दी

अमरावती / 4 जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापलेले आहे. नेतेमंडळी सभांमध्ये एकमेकांवर टीका करत आहेत. याच दौर्‍यात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी अमरावतीत सक्रिय झाले आणि भाजपच्या नवनीत राणांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला.
ओवैसी म्हणाले, तुम्ही चार नाही, आठ मुलं करा, आम्हाला काय करायचं, असे नमूद करत त्यांनी नवनीत राणांच्या हिंदूंना मुले वाढवण्याबाबतच्या वक्तव्यावर थेट टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमरावती आणि औरंगाबादमध्ये काहीच घडणार नाही, पण बडनेरामध्ये आपल्याला आपली जागा कायम राखावी लागेल. जे काकांचे झाले नाही, ते आपले कसे होणार? ओवैसींनी अजित पवारांवरही टीका केली आणि मतदारांना संदेश दिला की आता वेळ जागृतीची आली आहे. काहीजण अजितदादाच्या कामावर अवलंबून आहेत, पण आता पतंग उडवण्याची वेळ आली आहे. तुमच्या मताचा योग्य उपयोग करा आणि आपल्या ताकदीने सत्ता आणा, असे त्यांनी आवाहन केले.भाजपच्या टीकासंबंधी बोलताना ओवैसी म्हणाले, लोक म्हणतात ही भाजपची बी टीम आहे. पण मी तर अल्लाचा पुतळा आहे. कोणाचेही आदेश माझ्यासाठी नाहीत, असे स्पष्ट केले.मोहन भागवत यांच्यावरही ओवैसींनी थेट प्रश्न उपस्थित केला, मोहन भागवत म्हणतात लग्न केले नाही, मग लव्ह जिहाद काय? नागपुरात किती लव्ह जिहाद झाले, कायद्याचं काय झाले?ओवैसींनी पुन्हा एकदा निवेदन दिले की, फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सांगावे की, येणार्‍या निवडणुकीत एमआयएमच्या मतांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यावेत. ते फक्त आपल्या जातीसाठी लढत आहेत. परंतु आपण आपल्या मतांच्या ताकदीने योग्य निर्णय घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेवटी, ओवैसींनी घोषणा केली की, 12 तारखेला ते पुन्हा अमरावतीत निवडणूक प्रचारासाठी येणार आहेत आणि मतदारांना सशक्त संदेश देणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button