अमरावती मंडल सीपी अरविंद चावरियांच्या हस्ते गणेश आरती

-कार्यालयात विराजली दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती
-परंपरेचा गौरवशाली वारसा जपणारा ‘अमरावती मंडल’ परिवार
-पुण्याच्या देशमुख बंधूंनी साकारलीय देखणी मुर्ती
अमरावती / 1 सप्टेंबर : पश्चिम विदर्भातील अग्रणी हिंदी दैनिक ‘अमरावती मंडल’ कार्यालयात दहा दिवसीय गणेशोत्सवाचा उत्साह दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे. या वेळी पुण्यातील ख्यातनाम देशमुख बंधूंनी साकारलेली आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेली आकर्षक मूर्ती खास आणून प्रतिष्ठापित करण्यात आली आहे.
मुख्य कार्यालय, खापर्डे बगीचा येथे सकाळ-संध्याकाळ नियमित पूजा-अर्चा आणि आरतीदरम्यान शहरातील मान्यवरांचा या उत्सवात सहभाग होत असून, शनिवारी झालेल्या संध्याकाळच्या आरतीत पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, सिटी कोतवालीचे थानेदार मनोहर कोटनाके यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या प्रसंगी ‘अमरावती मंडल’ चे प्रबंध संपादक अनिल अग्रवाल व प्रबंध संचालक राजेश अग्रवाल यांनी आयुक्त चावरिया यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. मंडल कार्यालयात गेली तीन दशके अखंड सुरू असलेली गणेशोत्सव परंपरा त्यांना सांगण्यात आली. याबाबत माहिती ऐकून चावरिया अत्यंत प्रभावित झाले. आरतीनंतर उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांनी संपादक व संचालक अग्रवाल बंधूंशी सध्याच्या समाज-प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधला.
त्याचप्रमाणे ‘अमरावती मंडल’ च्या गेल्या 30 वर्षांच्या गौरवपूर्ण कार्यकाळाची दखल घेत त्यांनी उपलब्धिपूर्ण पत्रकारितेसाठी व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. या प्रसंगी सँड अँड स्टोनचे संचालक ऋषी अग्रवाल तसेच अमरावती मंडल परिवारातील प्रणय अग्रवाल, अमन अग्रवाल, महीप अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.




