निःशुल्क आरोग्य उपचार शिबिर संपन्न
सुजोक थेरपी व स्माईल मुद्रा द्वारे 60 रुग्नानी उपचार शिबिराचा लाभ घेतला

अमरावती/16 मार्च -स्थानीय कव्हर नगर येथील प्रेमप्रकाश आश्रम येथे प्रेम प्रकाश सेवा मंडली आणि अमरावती सुजोक स्माईल टिमच्या सहयोगाने प्रोफेसर पार्क जे बू नचा जन्म महोत्सवाच्या निमित्याने निःशुल्क उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आला होता यशस्वी रित्या संपन्न झाला.
या उपचार शिबिरामध्ये 60 रुग्नानी उपचाराचा लाभ घेतला.हे शिबिर दिनांक 15 मार्च 2026 रोजी घेन्यात आला होता त्या शिबिराचे दिपप्रज्वलन जयकिशन यांनी केले या पसंगी रंजीत, राजकुमार रतलानी, घनशाम बुधवानी, नेहा रतलानी, ईक्षीता गनेशानी, और प्रेम प्रकाश सेवा मंडली सभी कार्यकत्ताओने सहकार्य केले. या शिबिरामध्ये अमरावती शहराचे सर्वच निलीमा भटकर, वैशाली बोरकर, अजय करवा, दिपक करवा, अमृता जाजु, सुनिता रायबोले, ज्योती भेले, शिल्पा देशमुख, कविता पिंपळे, शितल देशमुख, स्वागता देशमुख, दिपा ढबळे, जयश्री गुलवाडे, प्रनिता शेदुरकर थेरपीस्ट शिबिराला यशस्वी करण्या करीता परीक्षम घेतले.प्रेम प्रकाश सेवा मंडली अमरावती यानी भेट वस्तु देउन अमरावती सुजोक स्माईल टिमचे सतत्कार केले. दिपक करवा व लक्ष्मी करवा याचे शाल व श्रीफळ देउन सतत्कार केला. या शिबिरामध्ये बिना औषधीने सर्वच रोगांवर जसे की डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, निद्रानाश, चिंता, मानसिक विकार, उच्च/कमी रक्तदाब, मधुमेह, मानेचे विकार, स्पॉन्डिलोसिस, अस्थिसंधिशोथ, स्लिप डिस्क, सायटिका, स्नायूंची वेदना व आखडणे, मूळव्याध, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्वो, श्वसननलिका दाह व सायनसचा त्रास, सांधेदुखी, मानदुखी, खांदेदुखी, छातीत दुखणे, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, अॅलर्जी, पित्त, दमा, खोकला, सर्दी, बद्धकोष्ठता, जुलाब, त्वचेवर पुरळ उठणे, उलट्या, शस्त्रक्रियेनंतर व प्लास्टर काढल्यानंतर येणारा आखडलेपणा, डोळे/नाक/ कान/घसा/यकृत / पित्ताशय संबंधित विकार, तोंडातील फोड (अल्सर), तीव्र हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, मूत्रपिंड निकामी होणे, मुतखडा, प्रोस्टेटचे विकार, त्वचारोग, लघवीसंबंधी विकार, स्त्री व पुरुषांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या, संप्रेरकांचा असंतुलितपणा अंथरुणात लघवी करणे, पार्किन्सन रोग, वाढलेली क्रिएटिनिन पातळी, लठ्ठपणा, उंचीशी संबंधित समस्या आणि इतर सर्व प्रकारचे आजाराचा उपचार करन्यात आला.




