परतवाडा-अचलपूर नगरपालिकेत चार स्वीकृत सदस्यांची एकमताने निवड
लोकसेवेचा सन्मान करीत राजकीय पक्षांकडून नव्या चेहर्यांवर शिक्कामोर्तब

* अनिल अग्रवाल यांच्यासह अभय माथने आणि नील माहेश्वरी यांना ‘लॉटरी’
अमरावती /15 जानेवारी : परतवाडा-अचलपुर नगरपालिकेच्या सभागृहात आज लोकशाहीचा उत्साह पाहायला मिळाला. 41 लोकनियुक्त सदस्यांच्या उपस्थितीत चार स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडीमध्ये अनुभवी राजकीय चाणक्यांसोबतच सामाजिक कार्याचा वारसा जपणार्या नव्या चेहर्यांनी बाजी मारली आहे. विशेषतः प्रहार आणि अपक्ष नगरसेवकांच्या गटातून समाजसेवक अनिल चिरौंजीलाल अग्रवाल यांची झालेली निवड ही खर्या अर्थाने जनसेवेचा विजय मानली जात आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि विविध स्थानिक गटांनी आपापल्या समर्थकांना संधी दिल्याने आगामी काळातील नगरपालिकेचे राजकारण अधिक गतिमान होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय जनता पक्षाने आधीच ठरल्याप्रमाणे अभय माथने यांच्या नावाची घोषणा केली होती, तर काँग्रेस पक्षाकडून अब्दुल मुजीब अब्दुल रशीद ऊर्फ गुड्डू भाई (युनिक मोटर्स) यांना संधी देण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष कल्लू महाराज दीक्षित यांच्या गटातून रक्तदान समितीचे अध्यक्ष नील माहेश्वरी यांनी सभागृहात स्थान मिळवले आहे. या प्रक्रियेत सर्वात लक्षवेधी ठरली ती अनिल अग्रवाल यांची निवड. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ’श्याम रोटी केंद्र’ चालवून त्यांनी निस्पृह सेवा दिली आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यातील त्यांचा मोठा वाटा आणि जिल्ह्यातील राजकारणातील त्यांचा प्रभाव यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. नगरपालिकेच्या इतिहासामध्ये गुड्डू भाई, नील माहेश्वरी आणि अनिल अग्रवाल हे तीनही चेहरे प्रथमच सभागृहात प्रवेश करत आहेत. या नवनियुक्त सदस्यांमुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडीनंतर शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून सर्व स्तरांतून या चारही नवनियुक्त स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जनसेवेचा वारसा आता नगरपालिकेत – अनिल अग्रवाल यांची निवड म्हणजे सामाजिक कार्याचा झालेला मोठा सन्मान आहे. श्याम रोटी केंद्राच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरिबांची भूक भागवली असून त्यांची जिल्हास्तरीय राजकारणातील पकड आणि धार्मिक क्षेत्रातील सक्रियता वादातीत आहे. त्यांच्यासोबतच नील माहेश्वरी आणि गुड्डू भाई यांच्या पहिल्याच सदन प्रवेशामुळे आता नगरपालिकेत जनहितार्थ कामांना विशेष वेग मिळण्याची दाट शक्यता आहे.




