शिंदे सेनेतील प्रवेशानंतर माजी मंत्री जगदिश गुप्ता यांचा सत्कार

अमरावती : अमरावती जिल्ह्याचे लोकनेता अशी ख्याती असलेले माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता यांनी नूकताच मुंबई येथे एका भव्य समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानिमित्त गुप्ता यांचा अमरावती येथे गुलाबपुष्पांची माळा घालून स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी दै. अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, विमलभाई शाह, संदीप पटवा, नरेंद्र काठोळे, विजय उर्फ गुल्लू गुप्ता, अनिल झंवर, अशोक भाई, दीपक जाजू आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button