आपापसातील हेवे दावे विसरून शिवसैनिक म्हणून कामाला लागा

गजू पाटील वाकोडे यांचे प्रतिपादन

*अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा एक मताने निर्धार

अमरावती /10 जून: शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्व शिवसेना महाराष्ट्रभर प्रचंड वेगाने वाढत आहे. दर दिवशी होणारे दिग्गजांचे पक्ष प्रवेशाने इतर राजकीय पक्षांची दैना उडाली असून,याच पोर्शभूमीवर अमरावती जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना,महिला आघाडी पदाधिकारी यांची महत्वाची आढावा बैठक अमरावती विश्रामगृह सभागृहात शिवसेना अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख गजू पाटील वाकोडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेत संपन्न झाली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पोर्शभूमीवर शिवसेना नेते माजी केंद्रिय मंत्री आनंदराव अडसूळ, शिवसेना संपर्क मंत्री तथा मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचे आदेशानूसार होणार्‍या निवडनूका संदर्भात आढावा व चर्चा करण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिका- यांची महत्वपूर्ण आढावा बैठकीचे अध्यक्ष शिवसेना अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख गजू पाटील वाकोडे यांनी सर्व पदाधिकार्‍यांना आपसातील हेवे दावे बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा कट्टर शिवसैनिक म्हणून कामाला लागण्याचे आवाहन केले तसेच येत्या काळात आज जिल्ह्यावर बैठक झाली पुढे तालुक्यात आढावा बैठक घेऊन निष्क्रिय पदाधिकार्‍यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाईल, पक्षाला गालबोट लागेल असे कृत्य पदाधिकार्‍यांच्या हातून होता कामा नये, अमरावती जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता तो शिंदे साहेबांना पुन्हा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपल्या आत मधला शिवसैनिक जागा करून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अँड. ठाकूर प्रमोद सिंह गद्रेल यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना संबोधित करताना अमरावती जिल्ह्यात राज्यातून प्रथम क्रमांकाची पक्ष सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पडोळे यांनी आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेना पदाधिकारी सभागृहात असावे यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचे आवाहन केले. शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.वंदनाताई दारवेकर, रेखाताई खारोडे अरुणाताई इंगोले, महिला महानगर प्रमुख रश्मीताई तायडे व युवती सेना जिल्हाप्रमुख सौ.कोमल ताई बद्रे यांनी महिलांना निवडणुकीला सामोरे जाताना येणार्‍या अडचणी कथन केल्या आणि महिलांनी शिंदे साहेबांचे काम व लोकहितार्थ राबविण्यात येणार्‍या योजना घरोघरी पोचविण्यासाठी कष्ट घेण्याचे महिला पदाधिकारी यांना आवाहन केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख छत्रपती भाऊ पटके, महानगर प्रमूख संतोष बद्रे ,उमेश भाऊ घुरडे आदी ज्येष्ठ पदाधिकारी यांनी जिल्ह्याभरातील उपस्थित पदाधिकार्‍यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी गजू पाटील वाकोडे संपर्क प्रमुख अमरावती, अँड.ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल जिल्हा प्रमुख अमरावती,अरुण पडोळे जिल्हाप्रमुख अमरावती,संतोष बद्रे महानगर प्रमुख अमरावती, ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी उमेश भाऊ घुरडे,प्रितेश अवघड युवासेना जिल्हा प्रमुख, कामगार सेनेचे राज्य चिटणीस वेदांत तालन, सौ.वंदना दारव्हेकर महिला सेना जिल्हाप्रमुख, सौ.अरुणा इंगोले महिला सेना जिल्हाप्रमुख, सौ.रेखा खारोळे महिला सेना जिल्हाप्रमुख, सौ.कोमल बदरे युवती सेना जिल्हाप्रमुख, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ रश्मी तायडे, छत्रपती फटके उपजिल्हा प्रमुख,बंडू घोम उपजिल्हा प्रमुख,आशिष बेलोकर उपजिल्हा प्रमुख,अमन सोनोने उपजिल्हा प्रमुख,रोशन लोखंडे उपजिल्हा प्रमुख,विवेक महल्ले तालुका प्रमुख अचलपूर,मंगेश काळमेघ तालुका प्रमुख अमरावती, शैलेश मालविय तालुका प्रमुख धारनी,पंकज निंभोरकर तालुका प्रमुख चांदूरबाजार,संजय टेकाडे तालुका प्रमुख मोर्शी,पवन ठाकरे तालुकाप्रमुख नांदगाव खंडेेशर, अमरावती शहर प्रमुख अजय महल्ले,अचलपूर शहर प्रमुख अतिश अहिर, परतवाडा शहर प्रमुख विलास सोळंके,शारदा पेदाम शहर प्रमुख अमरावती,सुरेश चव्हाण युवासेना शहर प्रमुख अमरावती,परतवाडा युवा सेना शहर संघटक पंकज पर्वतकर, युवा सेना अचलपूर शहर प्रमुख विशाल गौर,युवा सेना उपजिल्हा प्रमुख बंटी पवार, तालुका प्रमुख सतीश पांडे अंजनगाव, संतोष ठाकरे दर्यापूर, वेदांत देशमुख अचलपूर, अंजनगाव तालुका संघटक सतीश नागे,तूलाराम चांदेकर,नितेश शर्मा, अक्षय पवार, सागर पाटील,मिलिंद लोणपांडे, राजेंद्र देवडा, मधुकरराव शिंदे, गणेशराव तायवाडे, ज्योती साहू, शारदा पेदाम, , सुनील पाटील, श्रीकांत पत्रे,रोहित गाठे, संगीता मडावी, सुनील चित्ते,चंद्रशेखर पवार, विकेश गवाले, शुभम ढगे, राम मासुलकर, विक्रम गुंतले, विनायकराव पठारे, उमेश पठारे, यशोदीप पाटणकर, राजेश धोटे, विलास सोळंके, संजय हिरपूरकर, पंकज पर्वतकर, मनोज जैन, सतीश घाटे, राजेश पाठक, बाबुराव बारबदे, शैलेंद्र दरोकार, शाम आगरकर, हर्षद करडे, अचल कोल्हे, सुनील रुद्रकार, सावंत ढोके, विनोद तिवारी, शरदराव तालन, सचिन घोरे, ऋषिकेश गोरले, राजेश विघे,समिर खान यासह असंख्य पदाधिकारी आढाव बैठकीला उपस्थित होते. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा सेना जिल्हाप्रमुख प्रितेश भाऊ अवघड यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button