विजेचा शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू
सावंगी मग्रापूर येथील घटना

चांदूररेल्वे /8 सप्टेंबर : पहाटे शेतात गेलेल्या एका शेतकर्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार 7 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सावंगी मग्रापूर शेत शिवारात घडली. जगनराव अभिमानजी इंगळकर (65) रा. सावंगी मग्रापूर असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
जगनराव इंगळकर यांनी सावंगी मग्रापूर शेतशिवारात मत्क्त्याने नातेवाईकाची शेती केली. 7 सप्टेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सकाळचे दहा वाजले तरी ते घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेतातील विहिरीजवळ वडील निपचित पडून दिसले. सदर घटनेची माहिती त्वरित नातेवाईकांना व चांदूररेल्वे पोलिसांना देण्यात आली. चांदूररेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांच्या पश्चात पत्नी माजी सरपंच उमा इंगळकर, तीन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.




