वीज बिलामध्ये 12 टक्क्यांनी कपात
हायकोर्टाच्या आदेशानंतर इंधन अधिभार शून्यावर

* सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला
अमरावती/ 5 नोव्हेंबर – राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वीज बिलामध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महावितरणाची वीज स्वस्त झाली आहे. महावितरणाच्या बिलामध्ये जवळपास 12 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणाच्या वीज बिलामध्ये जवळपास 12 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या 28 मार्चच्या आदेशानुसार तूर्तास वीज बिल आकारणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर महावितरणाची वीज स्वस्त झाली आहे. महावितरणाने मागच्या महिन्यात वाढवलेल्या घरगुती ग्राहकांच्या वीज वापरानुसार प्रति युनिट 35 ते 95 पैसे इतका इंधन अधिभार आकरण्यात आला होता. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये हा इंधन अधिभार शून्यावर आणण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच महावितरणाची वीज स्वस्त झाली असून बिलामध्ये 12 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.




