विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सहल व टेक्निकल फिल्ड व्हिजिट
पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या

अमरावती /26 फेब्रुवारी : पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या प्रथम व द्वितीय वर्ष डिग्री व डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सहलीचे तसेच टेक्निकल फिल्ड व्हिजिट चे आयोजन करण्यात आले होते सदर व्हिजिटमध्ये सर्वप्रथम महिमापुर येथील स्टेप वेल ची विद्यार्थ्यांनी पाहणी केली सरपंच श्री अमोल पाटील वाटाणे यांनी विद्यार्थ्यांना देवगिरी साम्राज्यातील 12 व्या शतकातील ऐतिहासिक महिमापुर पाय विहिरी बद्दल इत्यंभूत माहिती दिली, विहीर निर्माण करण्याकरिता लागणार्या विटा तसेच दगड व इतर साहित्य तसेच विहीर मजबुती करिता काय उपाययोजना केल्या होत्या हे जाणून घेतले, यानंतर सरपंच अमोल पाटील वाटाणे यांनी सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वागत केले व आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत च्या योजना कशा असतात व त्याची प्लॅनिंग कशी करावी याविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आल.दरम्यान विध्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नाची समाधान पूर्वक उत्तर व माहिती सरपंच श्री.अमोल वाटणे यांनी दिली.पुढील सत्रात श्री संत गाडगेबाबा गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट माऊली धांडे येथे भेट दिली व तेथील गौरक्षण तसेच पर्यावरण विषयी चालू असलेले कार्य याबाबत माहिती जाणून घेतली. प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी सर्व शिक्षक वर्गाचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपले अनुभव सांगितले, व विध्यार्थ्यांना काही सूचना दिल्या जेणेकरून पुढील आयुष्यात त्यांना आपले ध्येय प्राप्त करता येईल. आर्कि. प्रा. स्नेहल विधळे,आर्कि.प्रा.तृप्ती भामकर प्रा. भूपेंद्र जयस्वाल,हरीश पळसोकार प्रामुख्याने उपस्थित होते. फिल्ड व्हिजिट ची विध्यार्थी संयोजिका म्हणून बी आर्च द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी कडू हिने आपली जबाबदारी पार पाडली. सदर शैक्षणिक फिल्ड व्हिजिटमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंद लुटला.




