डॉ.सुभाष सावरकर यांचे निधनानंतर नेत्रदान

अमरावती /6 जानेवारी : समीर सुभाष सावरकर यांचे वडील, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व साहित्यिक डॉ. सुभाष दामोदर सावरकर (वय 79), राहणार शिल्पकला कॉलनी, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती, यांचे दि. 03 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सावरकर परिवाराने सामाजिक जाणीव आणि मानवतेचे दर्शन घडवत नेत्र दानाचा निर्णय घेतला.
डॉ. सावरकर यांच्या निधनाची माहिती मिळताच कन्नूभाई देसाई यांनी तत्काळ हरीणा नेत्रदान समितीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पोपट यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर चंद्रकांत पोपट यांनी आपल्या कार्यक्षम चमूशी समन्वय साधत नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि नियमानुसार पूर्ण केली. ही नेत्रदान प्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णा लय, अम रावती चे डॉ. अमित शिंदे आणि समु पदेशक निलेश ढेंगळे यांनी अत्यंत जबाबदारीने संपूर्ण वैद्यकीय व समुपदेशनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी हरीणा नेत्रदान समितीच्या वतीने कार्याध्यक्ष चंद्रकांत पोपट तसेच नेत्रदान समिती प्रमुख शरद कासट हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच सावरकर परिवाराच्या वतीने मृतकाची कन्या रश्मी सावरकर, कृष्णकांत पराते, शाम पिंजरकर, प्रकाश आमले, दिनेश राऊत, अनिल प्रांजळे, योगिता पिंजरकर यांच्यासह इतर कुटुंबीय उपस्थित होते. डॉ. सुभाष सावरकर यांनी आपल्या आयुष्यात वैद्यकीय सेवेद्वारे समाजाची सेवा केलीच, मात्र त्यांच्या पश्चात केलेल्या या नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींना नवे जीवन आणि उजेड मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सावरकर परिवाराचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत हरीणा नेत्रदान समितीच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले. दरम्यान, नेत्रदानाबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असून, अधिकाधिक नागरिकांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन हरीणा नेत्रदान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नेत्रदानाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : शरद कासट (नेत्रदान प्रमुख) – 98231 63331 चंद्रकांत पोपट (कार्यकारी अध्यक्ष) – 95921 44444 रामप्रकाश गिल्डा (उपाध्यक्ष) – 93702 85710.




