डॉ.पंडीत भोयर यांना पीएच.डी. पदवी

अमरावती /24 फेब्रुवारी : विदर्भाच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान – ऐतिहासिक अभ्यास या विषयावर सखोल संशोधन पूर्ण केल्याबद्दल डॉ. पंडीत चंपतराव भोयर यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी पीएच.डी.ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाने दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत अधिसूचना जारी करत या पदवीची घोषणा केली होती.
डॉ. भोयर यांनी आपल्या संशोधनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विचारांचा विदर्भाच्या विकास प्रक्रियेवर झालेला प्रभाव ऐतिहासिक दृष्टीकोनातून अभ्यासला आहे. संदर्भाधारित विश्लेषण, शास्त्रशुद्ध मांडणी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम त्यांच्या प्रबंधात दिसून येतो. विविध ऐतिहासिक कागदपत्रे, संशोधनग्रंथ, सामाजिक चळवळींची नोंद तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यासाच्या आधारे त्यांनी आपले संशोधन अधिक परिपूर्ण केले आहे. या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. ओमराज गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयाप्रती निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी हे शैक्षणिक यश संपादन केले.




