खा.डॉ.अनिल बोंडे यांची निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मोठी जबाबदारी

* प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून विशेष जबाबदारी

अमरावती । 5 ऑक्टोबर : भाजपाने अमरावतीचे माजी पालकमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यात न भूतो न भविष्यती असे ऐतिहासिक यश गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवल्यानंतर पुन्हा एकदा भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून डॉ.अनिल बोंडे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यांना हे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. दहा नगरपरिषद दोन नगरपंचायतीच्या निवड णुकीसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम लागू केला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यासाठी भाजपने देखील कंबर कसली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा माजी कृषी मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्ह्यात निवडणूकांचे रणशिंग फुंकले आहे. त्याप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉ.अनिल बोंडे यांची अमरावती जिल्ह्याच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यासाठी डॉ.अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, स्थानिक स्तरावर बूथ पासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत भाजपचे संघटन अतिशय बळकट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील कार्यकर्ता प्रचंड आशावादी आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने भाजप या सर्व निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button