जिल्ह्यातील धरणे तुडुंब : अप्पर वर्धा 86 टक्के क्षमतेत?
शहानुर, सपन, पूर्णातही समाधानकारक साठा

-पिण्यासह सिंचन व उद्योगांसाठी मूबलक पाणी
अमरावती / 25 ऑगस्ट : गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे कॅचमेंट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण तब्बल 86 टक्के क्षमतेने भरल्याने अमरावती व बडनेरा शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्याचबरोबर सिंचन व उद्योगांना पाणीपुरवठ्याचीही हमी मिळणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
शहानुर व सापन धरण प्रत्येकी 80 टक्के भरले असून पूर्णा धरण 72 टक्के भरले आहे. 48 लघु प्रकल्पांतही 72 टक्के पाणी साठा झाल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धरणांची स्थिती (आकडे दलघमीमध्ये) याप्रमाणे आहे. अप्पर वर्धा – 471 (86%), शहानुर – 37.25 (80%), पूर्णा – 25.81 (72%), सपन – 30.92 (80%), 48 लघु प्रकल्प – 163.88 (72%).




