काँग्रेसचा सरकारविरोधात भव्य ट्रॅक्टर मोर्चा

शेतकर्‍यांना कर्जमाफीसह आर्थिक मदतीची मागणी

* शासनाला निवेदन सादर

परतवाडा /9 ऑक्टोबर : राज्यातील महायुती-भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आज परतवाडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य किसान ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले, या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांनी केले. अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यातील तब्बल शंभरहून अधिक ट्रॅक्टरसह शेकडो शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून एसडीओ कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात सहभागी झाले; “तानाशाही नहीं चलेगी!”, “जो सरकार निकम्मी है, वह सरकार बदलनी है!” अशा घोषणांनी परतवाडा आणि अचलपूर हे जुळे शहर दणाणून गेले. मोर्चाच्या दरम्यान शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने जिल्हाध्यक्ष देशमुख व खासदार वानखडे यांनी शासनाला निवेदन सादर केले ज्यात शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची सरसकट पीकनुकसान भरपाई द्यावी, कर्जमाफी तातडीने जाहीर करावी, विजबिल माफी आणि शेतकर्‍यांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, खरीप हंगाम हातातून गेल्याने रब्बी हंगामासाठी बी-बियाणे व खते अनुदान तत्त्वावर निशुल्क उपलब्ध करून द्यावीत असे ठळक मागण्या मांडण्यात आल्या आणि या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. मोर्चादरम्यान शेकडो ट्रॅक्टरांवर करपलेली सोयाबीन, ज्वारी आणि हातात मागण्यांचे कटआउट, झेंडे, फलक घेऊन शेतकरी निघाले होते; हा मोर्चा शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा आणि शेतकर्‍यांचा संताप व निर्धाराचे प्रतीक ठरला. मोर्चाच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींसह काँग्रेसचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना निवेदन देण्यासाठी महसूल कार्यालयात दाखल झाले आणि एसडीओ अरखराव यांनी प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले. या किसान ट्रॅक्टर मोर्चात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते; यात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष नामदेव तनपुरे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अमोल चिमोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य वासंती मगरोळे, अनु. जाती विभाग अध्यक्ष राहुल गाठे, सेवादळ अध्यक्ष सचिदानंद बेलसरे, ओबीसी विभाग अध्यक्ष दिनेश वानखडे, संचालक अमोल बोरेकार, रवी पाटील, सुधीर राहटे, ज्ञानदेव पाटील, कैलास आवारे, अनिल पवार, सागर व्यास, श्रीधर काळे, देवेंद्र पेटकर, किशोर देशमुख, उत्क्रांत देशमुख, अनिश खान, अजीज खान, इतशाम नबील, जिएम खान, साईद मौलाना, कदीर पहेलवान, निकेश दाभाडे, संजय शेटे, अरविंदराव लंगोटे, अवधूत मातकर, स्वप्निल देशमुख, श्रीकृष्ण वानखडे, शिवानंद मदने, नंदकिशोर भोयर, सुरेश नागापुरे, राजाभाऊ उल्ले, गोपाल शिरभाते, रमेश गुलक्ष, दिलीप सावरकर, जावेद भाऊ, रवींद्र वैराडे, बाबुभाई इनामदार, जीवन भाई, पंकज कडू, मंगलदास देशमुख आदींसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी अचलपूर मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या हक्कासाठी ही लढाई सुरूच राहील असे सांगितले आणि सरकारला सरसकट पीकनुकसान भरपाई व कर्जमाफी तातडीने देण्याचा इशारा दिला; शासनाने दुर्लक्ष केले तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button