कृषी कार्यालयाच्या विहिरीवरबसून काँग्रेसचे आंदोलन

विमा परताव्यासाठी शेतकरी आक्रमक

तिवसा /3 नोव्हेंबर : पीक विमाबाबत पाहणी करून देखील शेतकर्‍यांना विम्याचा परतावा मिळाला नाही त्यामुळे आज ता. 3 रोजी तिवसा तालुका कृषी कार्यालयात असलेल्या विहिरीवर काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात घोषणा करत शेतकर्‍यांनी विमाचे पैसे तातडीने जमा करावे अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.सरकारने यावर्षी एक रुपयात विमा पॉलिसी बंद केल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भृदंड सहन करून आपल्या पिकांचा विमा नगदी स्वरूपात उतरावा लागला,मात्र खरिपातील सोयाबिन पीक हे पूर्णपने उध्वस्त झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले,परंतु सरकारकडून विमा परतावा मिळण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या अधिकृत सूचना नसल्यामुळे विमाधारक शेतकरी संभ्रमात आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात आक्रमक शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत मदतीसह विमा परतावा देण्याची मागणी केली केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकूंद पूनसे,दीपक देशमुख,सुभाषराव ढगे,किशोर गोरडे,प्रतापराव खैरकार, संदीप ढोक, कैलास पूनसे, रवी जवंजाळ,रामचंद्र मनोहरे,विनोद मोंढे, योगेश भगत,शंकरराव होले, उमेश इंगोले,काशिनाथ पाटील, राजुभाऊ कोल्हे,पुरोशोत्तम गोरडे,धनराज अढाऊ,नारायणराव वानखडे,मनीष गाडगे,पंकज कडू, जा लाधे,बबलू इंगोले,जीवन उंद्रे,सुरेंद्र जवंजाळ,निवृत्ती मोकद्दम,मंगेश ढोक,राधेश्याम महात्मे,विनोद मसलदी,पंकज कळंबे,महेश थोटे,आशिष ढोरे,वैभव सरोदे,ओम घुरडे,सूरज पांडे,तेजस तालन,संदीप थोटे,राहुल लवनकर आदी शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button