हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापुरात काँग्रेसचे मौन आंदोलन

न्यायधीश डॉ. भूषण गवई यांच्यावर झालेल्या

दर्यापूर /8 ऑक्टोबर – दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सूचनेनुसार भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका वकिलाने बूट फेकून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापुरात काँग्रेस पक्षातर्फे मौन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह दर्यापूर तालुका व शहर आणि परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर येथील एसडीओ व तहसीलदार यांना निवेदन सादर करून हल्लेखोर वकिलावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. भूषण गवई हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून, त्यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ त्यांच्यावरच नव्हे, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवर असलेला एक प्रकारचा आक्रमण असल्याचे मत खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी व्यक्त केले. हल्लेखोर वकिलाविरुद्ध कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

त्याप्रसंगी सुनील पाटील गावंडे, बाळासाहेब हिंगणीकर, ईेशर भाऊ बुंदेले, संजू भाऊ बेलोकार, गजानन पाटील देवतळे, अमोल देशमुख, दिलीप गावंडे, नितेश वानखडे, अनिल पाटील भारसाकडे, दिनकरराव गायगोले, साहेबराव भदे, प्रभाकर पाटील कोरपे, नंदू मेहेरे, अरिफ भाई कालू भाई, दत्ता पाटील कुंभारकर, मधु भाऊ घाडगे, संतोष शिंदे, जुबेर भाई, इरफान भाई, विनोद वानखडे, ऍड. निशिकांत पाखरे, नदीम भाई, वसीम भाई, जम्मू पठाण, सोनू शहा, प्रशांत देशमुख, विनोद बोरेकर, दिवाकर उर्फ बबनराव देशमुख, असलम भाई गाणी वाले, रामेश्वर दांडेकर, सागर काळे, नितीन गावंडे, बच्चू कडू, शिवाजी देशमुख, बबलू भाई कुरेशी, राजेंद्र नागपुरे, आतिश शिरभाते, राजेश भाऊ खेडकर, रामेश्वर चव्हाण, अनिल बागडे आणि प्रदीप बाप्पू देशमुख उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button