आज डाक अदालतीचे आयोजन

अमरावती /8 डिसेंबर  : भारतीय डाक विभागामार्फत मंगळवार, दि. 9 डिसेंबर 2025 रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर याबाबत तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसणे आणि समाधानकारक उत्तर मिळालेली नसणे अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी अर्ज प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग, अमरावती 444 602 यांच्याकडे सादर करावेत. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकार्‍यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करावा, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button