शहरी भागातील नालास्थळी जनसुविधेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यास कटिबद्ध

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

अमरावती /7 डिसेंबर  : अमरावती शहरातील मुख्य लोकवसाहत भागातून प्रवर्तित होणार्‍या सदीच्छा कॉलनी-विनायक नगर ते राधा नगर-जिजाऊ कॉलनी पर्यंतच्या मोठ्या नाल्यावर पावसाचे दिवसात पुर सदृशस्थिती निर्माण होऊन संभाव्य जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती.
त्यामुळे या नाल्यावर दीर्घकालीन सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी नाल्याला संरक्षण भिंत उभारणे महत्वाचे असल्याने मागील पाच वर्षापासून प्रयत्न सुरु केले. मात्र अमरावती मनपा किंवा जिल्हा नियोजन अंतर्गत इतक्या मोठ्या प्रमाणात निधीचे नियोजन करणे शक्य नसल्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. व शासनाच्या आपत्ती सौम्मयीकरण कामांतर्गत हि बहुप्रतीक्षित समस्या मार्गी लागली असून शासनाकडून 40 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने आज या नाल्यावर संरक्षण भिंत साकारण्याचा कामाचे भूमिपूजन करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन अमरावतीच्या आ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सदीच्छा कॉलनी-विनायक नगर ते राधा नगर-जिजाऊ कॉलनी पर्यंतच्या मोठ्या नाल्यावर संरक्षण भिंत बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम आज रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला. यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनची औपचारिकता साधली. पुढे बोलतांना आ.सुलभाताई खोडके म्हणाल्या कि, विद्यापीठ पासून ते पीडीएमसी व पुढे रेवसा पर्यंत एक मोठा नाला वाहत असून आज पर्यंत हा नाला दुर्लक्षित राहिला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकवस्ती वाढत असल्याने पावसाच्या दिवसात हा नाला ओसंडून वाहत असल्याने स्थानिक भागातील नागरिकांना मोठी समस्या भेडसावत होती. कोरोना काळात आपण प्रत्यक्ष या नाल्याची पाहणी करून त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे अभिवचन स्थानिक नागरिकांना दिले होते. तद्नंतर जिल्हा नियोजन च्या बैठकीमध्ये सुद्धा याबाबत वारंवार मुद्दा उपस्थित करून निधीची तरतूद करण्याबाबतची मागणी केली. मात्र सदर कामासाठी मोठा निधी आवश्यक असल्याने राज्यविधीमंडळाच्या अधिवेशना तही मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना सुद्धा अवगत करण्यात आले असता त्या नाला संरक्षण भिंत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच सदर काम पूर नियंत्रण उपाययोजना निधी अंतर्गत करणे शक्य नसल्याने ते काम आपत्ती व्यवस्थापन मधून करण्याबाबतही ना. अजितदादा पवार यांनी शासनाला निर्देश दिले. त्यांनतर मागील 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करून आपत्ती सौम्ययीकरण कामांमधून सदीच्छा कॉलनी-विनायक नगर ते राधा नगर-जिजाऊ कॉलनी पर्यंतच्या मोठ्या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याच्या 40 कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळेच सर्व तांत्रिक प्रकिया पूर्ण करून आज हे बहुप्रतीक्षित काम मार्गी लागले असल्याचे आमदार -सौ.सुलभाताई खोडके यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आगामी काळात उर्वरित नाल्यावर सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या उपाययोजना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार महोदयांनी व्यक्त केला. बोले तैसे चाले या उक्तीप्रमाणे आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी हि प्रदीर्घ व बहुप्रतीक्षित मागणी निकाली काढून स्थानिक भागात जनसुविधेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना केल्या बद्दल सर्व नगरवासीयांचे वतीने त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी आ.सुलभाताई खोडके व श्री. यश खोडके यांचा यथोचित सत्कार करून प्रभागात विकासाला बळकटी देण्यासाठी आमची सदैव तुम्हालाच साथ राहणार असल्याची ग्वाही सुद्धा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान प्रभाग क्र. 2 गाडगे नगर येथील संजीवनी कॉलनी मधील अंतर्गत रस्त्याचे व नालीचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन सुद्धा आमदारांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ.सुलभाताई खोडके यांच्या समवेत श्री.यश खोडके, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, उपविभागीय अभियंता विनोद बोरसे, शाखा अभियंता सुनील जाधव, अभित्रंनीकी सहाय्यक स्वप्नील तालन, कंत्राटदार अजय हेडा, तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे अध्यक्ष सदाशिवराव चिंचे, प्रमोद महल्ले , योगेश सवई , मीनलताई सवई, मोहन क्षीरसागर, बाळासाहेब मार्डीकर ,राजेंद्र खोरगडे , योगिता गिरासे ,हिरामण गावंडे , अखिल हाते , बादल काळे, दीपक यादव, संकेत बोके , सार्थक खोरगडे आदींसह सदीच्छा कॉलनी-विनायक नगर , राधा नगर, गाडगेनगर, प्रेरणा नगर, जिजाऊ कॉलनी आदी भागातील नागरिक तसेच महिला भगिनी व जेष्ठनागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button