आज मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा

अमरावती/24 नोव्हेंबर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी अमरा वती जिल्ह्याच्या दौर्या वर येत असून विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथून मोटारीने प्रयाण केल्यानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.25 वाजता विमानाने अमरावतीकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी 11.20 वाजता अमरावती विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. अमरावतीतून सकाळी 11.25 वाजता हेलिकॉप्टरने धारणी येथे प्रयाण होईल. सुमारे 11.55 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल मैदानावरील हेलिपॅडवर मुख्यमंत्री अवतीर्ण होतील. यानंतर दुपारी 12 वाजता मोटारीने रंगभवन मैदान, धारणी येथे प्रस्थान होईल. दुपारी 12.05 वाजता तेथे आयोजित प्रचार मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित जनतेला संबोधित करणार आहेत. मेळाव्यानंतर दुपारी 12.50 वाजता मुख्यमंत्री मोटारीने हेलिपॅडकडे रवाना होतील व 12.55 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल मैदानातील हेलिपॅडवर आगमन होईल. येथून दुपारी 1.00 वाजता हेलिकॉप्टरने हिवरखेड, जिल्हा अकोला याठिकाणी त्यांचे प्रयाण होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून स्थानिक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.




