सरन्यायाधीशांची रक्ततूला, रक्तदानासाठी वकिलांमध्ये उत्साह
जिल्हा वकिल संघाचे आयोजन

-25 जूनला नागरी सत्कार, तयारीला वेग
अमरावती / 20 जून: मुळ अमरावतीकर असलेले देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा 25 जून रोजी अमरावती शहरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सरन्यायाधीशांची रक्ततूला करण्यात येणार आहे. रक्ततूलेकरिता रक्त संकलित करण्यासाठी आज अमरावती जिल्हा वकिल संघाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला. 100 पेक्षा अधिक युनिट रक्त यावेळी संकलित करण्यात आले. अशाप्रकारची आणखी रक्तदान शिबीरे सरन्यायाधीशांच्या रक्ततुलेसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.
अमरावती जिल्हा न्यायालयातील लायब्ररी भवनात पार पडलेल्या या शिबीराला विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, विलास मराठे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. न्या. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. त्यांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. या शिबीराचे संयोजन माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. किशोर शेळके यांनी केले होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, उपाध्यक्ष अॅड. आशिष लांडे, सचिव अमोल मुरळ, विद्या मानके, सदस्य ऋषिकेश उपाध्ये, सुमित शर्मा, अक्षय बोले, नेतल मल्ला, आशिष सिंह परिहार, विशाखा तागडे, पूनम रिठे, प्रशांत मालानी, यांच्यासह रक्तदान समितीचे अजय दातेराव, श्याम शर्मा, प्रमोद शर्मा, शैलेश चौरसिया, सुनील अग्रवाल, योगेंद्र मोहोड, उमेश पाटनकर, निषाध जोध, पीडीएमसी रक्तपेढीचे डॉ. आशिष तायडे, डॉ. चिखले, डॉ. तेजस्विनी साळवे, डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. ऐश्वर्या देशमुख, भागवत, हारीस खान, यश सुंदरकर, प्राजक्ता गुल्हाणे यांनी योगदान दिले.




