सीईओंच्या दौर्‍यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल

संजीता मोहपात्रांची मेळघाटात अचानक भेट

-अनेक दुर्गम गावांत पोहोचून केली पाहणी
-अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई
अमरावती / 5 जुलै: अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी शुक्रवारी मेळघाटतील चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा अचानक दौरा केला. त्यांच्या पाहणीतून विविध विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर येउन प्रशासनाच्या नाकर्तेपणाची पोलखोल झाली. कर्तव्यास कसूर करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर ताशेरे ओढत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत सीईओ संजिता मोहपात्रा यांनी दिले आहे.
या दौर्‍यादरम्यान मेळघाटातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले. आरोग्य केंद्रांची दूरवस्थाही समोर आली. संजिता मोहपात्रा मेळघाटातील जेथे वाहने पोहोचणे कठिण आहे, अशा दुर्गम गावांनाही भेटी दिल्या. त्यासाठी पायदळ अरेच अंतरापर्यंत चिखल तुडवत त्या अशा गावांमध्ये पोहोचल्या. तेथील शासकिय कार्यालयांची अवस्था अत्यंत दयनिय असून त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांची हयगय कारणीभूत असल्याचे त्यांच्या निदर्शनातून स्पष्ट झाले.
संजिता मोहपात्रा यांनी आपल्या या दौर्‍यादरम्यान संजिता मोहपात्रा यांनी हलिदा, कुटिदा, हतरु, एकताई या गावांना भेटी देवून तेथील अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत आदी कार्यालयांचे निरिक्षण केले. काही शाळांमध्ये शिक्षक वेळेत निर्धारित वेळेत पोहोचले नव्हते. शालेय पोषण आहारात ठरल्यानुसार पदार्थ दिले जात नसल्याचे आढळून आले. पोषण आहारासंबंधीचे विवरणही रजिस्टरमध्ये नोंदविलेले नव्हते. ग्राम पंचायत कार्यालयातही कर्मचार्‍यांची अनूपस्थिती होती. यावेळी मोहपात्रा यांनी तेथील कामकाजाचे स्वत: अवलोकन केले. स्वास्थ केंद्रातही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संजिता मोहपात्रा यांचा पारा चढल्याचे दिसून आले. त्यांनी दोषींच्या नोंदी घेउन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
-5 अधिकार्‍यांना शोकॉज
या दौर्‍यादरम्यान कर्तव्यात हयगय करताना काढळून आलेल्या 5 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिस बजावली असल्याचे सीईओ संजिता मोहपात्रा यांनी दै. मातृभूमिशी बोलताना सांगितले. ग्रामपंचायत अधिकारी हतरु, केंद्र प्रमुख हतरु, शालेय पोषण अधीक्षक चिखलदरा, अंगणवाडी सेविका एकताई आणि सुटिदाह यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
– 5 शिक्षकांचे निलंबन
सीईओ संजिता मोहपात्रा यांनी सांगितले की, या अकस्मात दौर्‍यादरम्यान शाळांमध्ये शिक्षकांकडून आपल्या कर्तव्यात अनेक उणिवा ठेवल्या जात असल्याचे आढळून आले. त्याआधारे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांतील 5 शिक्षकांचे निलंबन केले आहे. तसेच एकताई येथील ग्राम पंचायत अधिकार्‍यालाही निलंबित करण्यात आले आहे. हिलदा शाळेतील एक, एकताई शाळेतील दोन आणि खुटीदाह येथील दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button