श्री ह.व्या.प्र. मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘क्रिप्टेक्स टेक्नॉलॉजी’चा कॅम्पस ड्राइव्ह

अमरावती /9 फेब्रुवारी : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व एमसीए अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील क्रिप्टेक्स टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले.या कॅम्पस ड्राइव्हसाठी 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कंपनीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) धांडे तसेच मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधी रसिका दिवाण यांनी विद्यार्थ्यांची अॅप्टिट्यूड चाचणी घेतली. अॅप्टिट्यूड चाचणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे एचआर मुलाखत तसेच सीईओ मुलाखत घेण्यात आली. या निवड प्रक्रियेत कम्प्युटर सायन्स विभागातील तन्वी पोहनकर, अमिषा कातवणे तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील कार्तिक श्रीवास, तन्वी जीवतोंडे या चार विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली.सदर कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रणव चेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.




