पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना बीएसएफ कडून अभिवादन

अमरावती /22 फेब्रुवारी : 14 फेब्रुवारी 2019 रोजी श्रीनगरला जाणार्‍या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सीआरएफ ताफ्याला एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकाने भरलेल्या वाहन आदळले. या भीषण हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना अमरावती बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. अमरावती संस्थाध्यक्ष माजी सैनिक श्रीकांत शेगोकार यांनी आयोजित अंबादेवी संस्थान परिसरातील कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट वैभव निमकर प्रवीण मसराम जोशना शेटे हुकुमचंद अग्रवाल राजेंद्र गडेकर शिल्पा गावंडे विक्रम ठाकुर उमेश वैद्य विवेक अनुराधा यश सहस्त्रबुद्धे प्रवीण बाजड जयश्री भुतडा संदीप शर्मा दीपक दार्वेकर संजय खोडे अनिल वानखडे वर्षा गर्गे मनोज बस इत्यादी मंडळी हजर होती.

संबंधित बातम्या

Back to top button