बडनेरातील मिलिंद लाड यांची निर्घृण हत्या

अज्ञात मारेकरी फरार

* बडनेरा पोलिसांकडून कसून शोध सुरू

बडनेरा /24 सप्टेंबर :  बडनेराच्या जुनी बस्ती परिसरातील रहिवासी मिलिंद लाड (46) यांची बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या घटनेत गंभीर दुखापतींमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील चव्हाण त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या हत्येमागील नेमके कारण तूर्तास समजू शकले नाही. बडनेरा पोलिस फरार झालेल्या मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेमुळे बडनेरा परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री बडनेरा पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button