स्वागत समारंभादरम्यान नवरदेवावर चाकू हल्ला
बडनेरा मार्गावरील साहील लॉनमधील संतापजनक घटना

* आरोपी फरार
बडनेरा /12 नोव्हेंबर : शहरातील अमरावती बडनेरा रस्त्यावर जुनी वस्ती परिसरातअसलेल्या साहिल लॉन’मध्ये मंगळवारी रात्री विवाहानंतर आयोजित
आशीर्वाद समारंभात एका तरुणाने मंचावर धावत जाऊन वरावर चाकूने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात वर सुजल समुंद्रे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या विवाहावेळी बँड वाद्याच्या कार्यक्रमावरून वर सुजल आणि आरोपी राघव जितेंद्र बक्षी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादाच्या रागातूनच मंगळवारी रात्री राघव आपल्या साथीदारासह समारंभात प्रवेश करून नवरदेव सुजल वर चाकू हल्ला केला. या हल्ल्याने समारंभात गोंधळ उडाला आणि पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर आरोपी आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेचे दृश्य समारंभातील ड्रोन कॅमेर्यात कैद झाले असून पोलिसांनी ड्रोनचे फुटेज ताब्यात घेतले आहे. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नेमले आहे. सदर प्रकरणात आरोपी राघव बक्षी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे शाम घुगे पोलीस आयुक्त कैलास फुंडकर बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तर याच भांडणाला अनुसरून फिर्यादी प्रीती जितेंद्र बक्षी राहणार माताफैल जुनी वस्ती बडनेरा यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा राघव हा दिनांक 9 /11 /2025 रोजी सुजल समुद्रे व सोनू समुद्रे यांच्या लग्नात गेला होता फिर्यादी यांचा मुलगा राघव याने लग्नाची वरात काढण्यासाठी डिजे करून दिला होता त्या डीजेचे पैसे फिर्यादिच्या मुलाने सुजल समुद्रे याला मागायला गेला असता सुजल समुद्रेनी फिर्यादीचे मुलाला शिविगाळ केली व फोन फेकून दिला होता फिर्यादी च्या मुलाला अंजनगाव सुर्जी येथे सोडून बाकीचे वराती घेऊन परत आले होते. दुसर्या दिवशी फिर्यादीचा मुलगा राघव घरी आला व ही संपूर्ण हकीगत सांगितली दिनांक 11 नोव्हेंबर रोजी फिर्यादीचा मुलगा सुजल समुद्रेच्या स्वागत समारंभात गेला होता. 11 नोव्हेबरच्या रात्री अकरा वाजता चे दरम्यान फिर्यादी यांच्या घरी राम समुद्रै ,सुजल समुद्रे, व सोनू समुद्रे, अधिक दहा ते बारा लोक घरी आले व फिर्यादी प्रिती बक्षी यांचा मुलगा राघव कुठे आहे असे म्हणून घराचे दार,




