तहसिल कार्यालयासमोर काळी दिवाळी व शिदोरी आंदोलन

तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने

वरुड । 17 ऑक्टोबर – तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज तहसिल कार्यालयासमोर काळी दिवाळी व शिदोरी आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन तसेच अतिवृष्टी यादीतून वरुड तालुका वगळला गेला, संत्रा व मोसंबी फळ गळतीसाठी अनुदान नाही, श्रावणबाळ योजना धारकांना सात महिन्यांचे वेतन नाही—या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून, शेतकऱ्यांनी वरुड तहसिल कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सभापती गिरीश कराळे, काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष राहुल बोडखे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र बोहरुपी, महिला तालुकाध्यक्ष प्रविणा बोहरुपी, शहराध्यक्ष चेतन देवते, महिला काँग्रेस शहराध्यक्ष सविता काळे, माजी नगरसेवक संजय डफरे, शेंघाट काँग्रेस शहराध्यक्ष पवन बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल वर्‍होकर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र सचिव निसार भाई, अ.जा. अ.ज.चे तालुकाध्यक्ष राजन सोनुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. प्रविण चौधरी, काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख मनिष धोटे, सोपान ढोले, प्रदीप कांबळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे, माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बाबाराव इंगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षल गलबले, माजी सरपंच मनोज पेलागडे, माजी नगरसेवक संजय कानुगो, माजी जि.प. सदस्य रामदास धुर्वे, माजी शहराध्यक्ष जितेन शहा, माजी सरपंच किशोर गोकाळे, आशिष श्रीराव, सय्यद मीर गौस अली, सारंग काळमेघ, अनुराग देशमुख, माजी सरपंच गणेश देशमुख, रोशन दारोकर, अनिल काळमेघ, अँड. पवन वाडीवे, प्रशांत काळबांडे, नारायण मस्की, चंद्रशेखर जाने, अनुज वडस्कर, पवन ठाकरे, साहेबराव गजाम, प्रफुल काकडे, उमेश बाहे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button