भाजपचे विदर्भस्तरीय अधिवेशन आजपासून
प्रदेश कार्याध्यक्ष चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

*मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त उपक्रम
अमरावती /11 जून: भारतीय जनता पक्षाचे विदर्भस्तरीय अधिवेशन आज 12 जून रोजी दुपारी 12 वाजता बडनेरा येथील राम मेघे शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर चव्हाण कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रविराव देशमुख आणि जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर आदींनी केले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण विदर्भातील जिल्हा पदाधिकारी अमरावती येथे येत आहेत. आ.चव्हाण पत्रकार परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त विदर्भस्तरीय भाजप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या इतर कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होतील. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजप खूप उत्साही असून विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त केल्याने पक्षात येणार्या लोकांची संख्या वाढत आहे. मंगळवारीच शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. खराटे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.