अचलपूर नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठी चूक

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

* चूक लपवण्यासाठी लढवली शक्कल

परतवाडा/24 नोव्हेंबर– अचलपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सात आठ दिवस बाकी असताना निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या कामातील दिरंगाई तसेच घोड चुका पुढे येत आहेत. यातील मतदान केंद्रनिहाय मतदार यादीतील हा वेळेचा घोड लक्षात आलेला आहे, त्यामुळे जर अशा प्रकारचे यादी पुढे ठेवून मतदान केले गेले किंवा मतदारांना या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्यास, निवडणुकीचा काहीतरी वेगळाच निकाल लागू शकतो, इतकी मोठी अक्षम्य ही चूक आहे, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या सर्व प्रकाराला व्यवस्थित लक्ष न घालता त्यावर सावरा सावराव करून शक्कल लढवित, थातूरमातूर काम केल्याचा प्रकार पुढे आलेला आहे. निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या दिवशी, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित केल्या जाते, या यादीवर मतदाराचे पूर्ण नाव वय लिंग पत्ता, प्रभाग क्रमांक, दिनांक आणि वेळ, तर युनिक मतदार क्रमांक असे सर्व नमूद असते, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदानाच्या दिवशी मतदानाचा वेळ निर्धारित केलेला असतो, हा वेळ साधारण 7:30 ते सायं 5:30 पर्यंत असावा, असे त्यामध्ये नमूद असते. मात्र अचलपूर नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे मतदानाच्या दिवशीचा वेळ हा सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5:30 असा दाखविण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच आता संशयाच्या भौर्‍यात आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.. सदर झालेला प्रकार हा जाणून-बुजून केलेला आहे की अनवधानाने झालेला आहे. याचे रहस्य केवळ निवडणूक निर्णय अधिकारी सांगू शकतील. मात्र जर निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या मतदार यादीतील वेळेप्रमाणे नागरिक मतदान करण्यास गेल्यास मोठ्या प्रमाणावर मतदार वंचित राहू शकतात, ही अतिशय धक्कादायक बाब पुढे आलेली आहे. या सर्व प्रकारानंतर काहीतरी सावरा सावर केल्याचा प्रकार सुरू असल्याचे समजत आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा निवडणूक अधिकारी कोणत्या प्रकारे लक्ष घालतात हे बघणे योग्य ठरेल. मात्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या बेजाबाबदार पणामुळे अचलपूर नगरपालिकेतील निवडणुकीच्या मतदान दिवशीचा वेळापत्रक चेंज करण्यात यावा याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

केंद्रनिहाय मतदान मतदान यादीतील घोळ या सर्व प्रकारामुळे पुढे आलेला आहे. वेळ ही साडेसात ची असते मात्र या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दहाची का दाखवली याची चौकशी होणे गरजेचे आहे.
– श्रीकांत झोडपे
शहराध्यक्ष काँग्रेस

केंद्रनिहाय मतदार यादीतील छापण्यात आलेली वेळ ही चुकीची आहे, ती आम्ही दुरुस्त करून, त्यावर शिक्का लावून पाठवितो.
निवडणूक निर्णय
अधिकारी अचलपूर.

सदर बाब ही अतिशय गंभीर आहे. ज्यामुळे मतदारां मध्ये संभ्रमाची परि स्थिती निर्माण होऊ शकते, परिणामी मतदानाची टक्केवारी ही घसरू शकते, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ताबडतोब यावर गंभीर दखल घेत सुधारित आवृत्ती बाहेर काढावी, याच्या सखोल चौकशीची मागणी आम्ही वरिष्ठांकडे करू.
-गजानन कोल्हे
भाजपा पदाधिकारी

संबंधित बातम्या

Back to top button