मोठी भेंडी शेतशिवारातील गोडवुनमध्ये चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

वरुड । 26 सप्टेंबर – तालुक्यातील मौजा मोठी भेंडी शेतशिवारातील गोडावूनची तारेची जाळी तोडून अ‍ॅल्युमिनियम तार बंडल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजा मोठी भेंडी शेतशिवारात फिर्यादी तुषार भाऊराव देशमुख (४९), रा. टेंभुरखेडा यांचे स्वतःचे मालकीचे श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रिकलचे गोडावून असून त्या गोडावूनमध्ये सर्व इलेक्ट्रिकचे साहित्य ठेवलेले आहे. नमूद घटनावेळी व ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने गोडावूनमधील अंदाजे ३ लाख ७५ हजार ते ४ लाख रुपयांचा जुना व नवीन स्वरूपाचा ९ हजार मीटर अ‍ॅल्युमिनियम तार बंडल गोडावूनची तारेची जाळी तोडून आत प्रवेश करून चोरून नेला आहे. या प्रकरणी फिर्यादी तुषार भाऊराव देशमुख (४९), रा. टेंभुरखेडा यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३०३ (२), भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजर्न ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button