संत अच्युत महाराज पुण्यतिथी निमित्त ‘भक्ती भावांजली’

प्रमोद पोकळे व संचाचे सादरीकरण

-बडनेरात रहाटगावकर निवास येथे आयोजन
बडनेरा / 14 सप्टेंबर : श्रीसंत अच्युत महाराज यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त बडनेरा येथील जुन्यावस्तीत श्रीकांत रहाटगावकर यांचे निवासस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे जीवन-प्रचारक तथा दूरदर्शन व आकाशवाणी लोक-कलावंत प्रमोद पोकळे व संच यांच्या भक्ती भावांजलीचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवर्य श्रीसंत अच्युत महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व आरती करण्यात आली. त्यानंतर गायक प्रमोद पोकळे व संच यांनी भजनरुपी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या संगीतमय भजन प्रस्तुतीने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी तबल्याच्या साथीला प्रशांत दुधे तर टाळ व सहगायनाच्या साथीला सर्वश्री राजेंद्र इंगोले, गणेश खंडार, निलेश रुमणे, मनोज संभे, अशोक रुमणे व सुनील तायडे आदी सहकलाकार होते. कार्यक्रम घडवून आणण्यास शरदराव रहाटगावकर, श्रीकांत रहाटगावकर, महेश रहाटगावकर व परिवारातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज विरचित राष्ट्रवंदना व जयघोष घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या या संगीतमय श्रद्धांजलीपर कार्यक्रमास दत्तात्रय रहाटगावकर, संत गाडगेबाबा रक्तपेढीचे संचालक सोपान गोडबोले, बंडोपंत जोशी, श्रीरंग वेळुकर, सचिन जोशी, श्याम खानझोडे, त्र्यंबक पांडे, शरद बाळापुरे, विद्याताई देव, साक्षी सहस्त्रभोजने, रश्मी देशपांडे, रंजना रहाटगावकर, रोहिणी देशपांडे, अनिता रहाटगावकर, कमलाबाई झलके, श्याम बडनेरकर, सुरेश वानखडे, अनिल पोकळे यांचेसह बहुसंख्येने भक्तमंडळी आवर्जून उपस्थित होती.

संबंधित बातम्या

Back to top button