अविनाश मार्डीकरांनी गढ राखला, राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी

बेनोडा भीमटेकडी प्रभागात घड्याळाचा गजर

* प्रतिष्ठा प्रभाग दहामध्ये घड्याळाचा गजर घुमला

अमरावती / 16 जानेवारी – महापालिका निवडणुकीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत बेनोडा भीमटेकडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची चारही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप आणि बसपाच्या तगड्या आव्हानाला धूळ चारली आहे. या विजयाने शहराच्या राजकारणात अविनाश मार्डीकर यांची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत बेनोडा भीमटेकडी या विस्तीर्ण प्रभागाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या प्रतिष्ठेच्या लढाईत अविनाश मार्डीकर यांनी स्वतः ’ड’ गटातून विजय मिळवत विजयाचा मार्ग प्रशस्त केला. त्यांच्यासोबतच ’अ’
गटातून सुजाता जवं जाळ, ’ब’ गटातून अर्चना पाटील आणि ’क’ गटातून माजी नगरसेवक मंगेश मनोहरे यांनी विजय संपादनला. विशेष म्हणजे, या संपूर्ण निवडणुकीत प्रभाग 10 हा एकमेव असा प्रभाग ठरला आहे. येथील राष्ट्रवादीची चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
आ.संजय खोडके यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अविनाश मार्डीकर यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शहरातील विकासकामांचा प्रगाढ अनुभव आणि मतदारांशी असलेला दांडगा संपर्क त्यांच्या पथ्यावर पडला. प्रतिस्पर्धी पक्षांमधील अंतर्गत बंडखोरीचा अचूक फायदा घेत मार्डीकरांनी रचलेली व्यूहरचना यशस्वी ठरली. त्यांनी माजी नगरसेवक संध्या टिकले, अजय गोंडाणे आणि ऋषी खत्री यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची ही कामगिरी अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button