इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर चोरीचा प्रयत्न
कॅबिनेटची तोडफोड करुन पसार

अमरावती /20 नोव्हेंबर : बडनेरा रोडवरील सातुर्णा परिसरात मारुती कारच्या शोरूमजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. शातिर चोराने कुलुप तोडून आत प्रवेश केला. मात्र लॉकर न फुटल्याने त्याच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्याला रिकाम्या हाताने परतावे लागले.
पेट्रोल पंपावर हात साफ न झाल्याने त्याने तोडफोड करून चोर दुचाकीवरून पळून गेले. सविस्तर माहितीनुसार, बडनेरा रोडवर कॅम्प रोड येथील रहिवासी सत्यजीत विजयराव बंड यांचा हा ‘अस्पा बंड’ मारुती शोरूम नावाचे पेट्रोल पंप आहे. बुधवारच्या मध्यरात्री पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर सर्व कर्मचारी आपआपल्या घरी गेले होते. मॅनेजर निलेश वसंतराव पडोळे हे सुध्दा घरी निघुन गेले होते. रात्री उशिरा एक सराईत चोर दुचाकीवर येऊन पेट्रोल पंपावर पोहोचला. त्याने आपली दुचाकी काही अंतरावर उभी केली आणि पेट्रोल पंपाच्या कॅबिनवरील शटरचे कुलूप तोडून आत शिरला. आत जाऊन त्याने लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला े यश मिळाले नाही. अथक प्रयत्न करूनही काही साध्य न झाल्याने तो बाहेर येऊन पळून गेला. सकाळी पेट्रोल पंपावर आलेल्या मॅनेजर आणि कर्मचार्यांना ही बाब लक्षात येताच निलेश पडोळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पेट्रोल पंपावर येऊन परिस्थितीचा आढावा घेत पंचनामा केला. प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिसांकडून सुरू आहे.




