कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालयात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
वलगाव विद्युत कार्यालयातील खळबळजनक घटना

*रात्री विजपुरवठा खंडीत वलगाव विद्युत कार्यालयातील खळबळजनक घटना झाल्याने नागरिक संतप्त
अमरावती /15 जून: वलगाव येथील विद्युत उपकेंद्रात (सब स्टेशन) रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कनिष्ठ अभियंता (अॅडिशनल) यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वलगाव परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री रेवसा परिसरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यानंतर रविवारी रेवसा येथील काही स्थानिक नागरिक वलगाव सब स्टेशन कार्यालयात तक्रार घेऊन आले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या दोन युवकांनी अचानक आपल्या खिशातून पेट्रोलची बाटली काढत कनिष्ठ अभियंत्याच्या टेबलवर आणि दस्तावेजांवर पेट्रोल ओतले. इतक्यावरच न थांबता त्यांनी अभियंत्यावरही या घटनेदरम्यान कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर कर्मचार्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांनी तात्काळ प्रतिकार केला आणि मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर कनिष्ठ अभियंत्यांनी वलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या दोन्ही युवकांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणामुळे एमएसईबी कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत यंत्रणेवर वारंवार होणारे असे हल्ले थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.