एमडी ड्रग विक्री प्रकरणात आणखी एकाला अटक
गुन्हे शाखा युनिट-2 ची कारवाई

अमरावती / 23 जुलै : 20 जुलै रोजी अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-2 ने दोन युवकांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून 110 ग्राम एमडी ड्रग जप्त केले होते. आज या प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून 9 ग्राम एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे. सय्यद जमीर उर्फ मुज्जु सय्यद नूर (22, रा. तालाबपुरा, अमरावती) असे आज अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आधी अटक करण्यात आलेल्या दोन युवकांनी सय्यद जमीर याच्याकडूनच हे मादक पदार्थ खरेदी केली होती.
20 जुलै 2025 रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने अतीक बेग अनिस बेग (रा. तालाबपुरा, अमरावती) आणि मोहम्मद रिजवान अब्दुल गणी (रा. अकबर नगर, अमरावती) यांना अटक करुन यांच्या जवळून सुमारे 110 ग्राम एमडी जप्त केली होती. ही एमडी आपण सय्यद जमीर उर्फ मुज्जु सय्यद नूर याच्याकडून खरेदी केल्याची माहिती अतीक बंग आणि मोहम्मद रिजवान यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सय्यद जमीर याचा शोध सुरु केला.
आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेने सय्यद जमीर याला वेलकम पॉईंट येथून शिताफीने अटक केली. यावेळी त्याच्याजवळही पोलिसांना 9 ग्राम एमडी आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यातुन 8.86 ग्राम चऊ हस्तगत झाली आहे. ही एमडी ड्रग अमरावती शहरात येते कुठून, ती खरेदी करणारे कोण, कशापकारे या मादक पदार्थांची शहरात विक्री होते याबाबत अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करुन या धंद्याच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले आहे.




