कराओके गायनाच्या माध्यमातून समाजकार्य करणार्‍या अनिल सरदार यांचा सत्कार

अमरावती/18 जानेवारी : एखादा छंद आपल्या कल्पकतेतून चांगल्या कार्यासाठी कशाप्रकारे वापरता येतो याचे उत्कृष्ट उदाहरण शहरात अनिल सरदार या बर्‍यापैकी गायकाने समाजासमोर ठेवला. गगलानी नगर विभागातील रहिवाशी हौशी कराओके गायक अनिल सरदार यांनी मध्यंतरी जोशी हॉल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गायकांकडून मात्र केवळ 150 रुपये निधी घेतला तोही निधी स्वतः न घेता गायकांकडून परस्पर बेघर निवारा केंद्र बडनेरा च्या ज्योती राठोड व राजू बसवनाथे या बेघर केंद्राच्या आयोजकांना कार्यक्रमात बोलावून गायकांकडून त्यांच्याकडे सुपूर्द केला. हा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी डॉ. गोविंद कासट मित्र मंडळी तर्फे दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवनात नववर्षाची पहाट तपोवनात या कार्यक्रमात अनिल सरदार व वर्ष सरदार या दांपत्याचा शाल व पुस्तक प्रदान करून सत्कार करण्यात आला.
संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मातोश्री कमलताई गवई यांच्या हस्ते झालेल्या सत्कारला मंचावर राजू बसवनाथे ज्योती राठोड सुदर्शन गांग दिलीप भाई पोपट धीरूभाई सांगानी डॉ. राजू डांगे सुभाष दुबे जीवन गोरे देवानंद गणोरकर प्रभा आवारे चंद्रकुमार जाजोदिया आकाश शिरभाते राजेंद्र वर्मा दिलीप सदार राजू आडतीया भाऊराव इंदाने दीपक दारव्हेकर प्राचार्य एस व्ही शिरभाते आदी मंडळी हजर होती.

संबंधित बातम्या

Back to top button