अनिल अग्रवाल यांची प्रचंड बहुमताने अध्यक्षपदी निवड

श्री अग्रसेन स्मारक समितीच्या निवडणुकीत श्री अग्रसेन नवनिर्माण पॅनलचे वर्चस्व

*श्री अग्रसेन स्मारक समितीचे 21 पैकी 17 उमेदवार विजयी
*प्रतिस्पर्धी अग्रसेन परिवर्तन पॅनेलला फक्त 4 जागांवर समाधान
*परिवर्तन पॅनलचे दिग्गज उमेदवार पराभूत
*विजयी गटाकडून ढोल-ताशांच्या गजरात जोरदार आतषबाजी
*नवनिर्वाचित अध्यक्षांच्या हस्ते विजयी उमेदवारांना दिले प्रमाणपत्र

अमरावती /11 ऑगस्ट : अग्रवाल समाजाची महत्वाची संस्था म्हणून ओळख असलेल्या श्री अग्रवाल स्मारक समितीची 2025-2028 या वर्षाच्या त्रैवार्षिक कार्यकारिणीची निवडणूक स्थानिक रायली प्लॉट येथील अग्रसेन भवन येथे रविवार 10 ऑगस्ट रोजी मतदानाने प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निवडणुकीत श्री अग्रसेन स्मारक समितीच्या 21 सदस्यीय कार्यकारिणीसाठी दोन पॅनेल रिंगणात उतरले होते. यामध्ये दैनिक अमरावती मंडल व मातृभूमिचे संपादक अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील श्री अग्रसेन नवनिर्माण पॅनेलने 21 पैकी 17 जागा जिंकून इतिहास रचला. यासोबतच पॅनेलचे नेतृत्व करणारे संपादक अनिल अग्रवाल यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. त्यांना 162 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि अध्यक्षपदासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार परमानंद सिंघानिया यांना फक्त 107 मतांवर समाधान मानावे लागले. उल्लेखनिय असे की, 66 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेली श्री अग्रसेन स्मारक समिती ही अमरावतीमध्ये राहणार्‍या अग्रवाल समाजाची सर्वोच्च संस्था मानली जाते. या माध्यमातून समाजाच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या देखभालीची जबाबदारी घेते. अशा परिस्थितीत अग्रवाल समाजासाठी या समितीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या समितीमध्ये 15 वर्षांनी निवडणुका झाल्या आणि निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे एकतर्फी लागले. 21 जागांपैकी संपादक अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील अग्रसेन नवनिर्माण पॅनेलने 17 जागांवर नेत्रदीपक विजय मिळवला. आणि प्रतिस्पर्धी अग्रसेन नवनिर्माण पॅनेलला 4 जागांवर समाधान मानावे लागले. श्री अग्रसेन स्मारक समितीच्या निवडणुकीसाठी रविवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रायली प्लॉट येथील अग्रसेन भवन येथे मतदान प्रक्रिया सुरू होवून दुपारी 4 वाजता पूर्ण झाली. या निवडणुकीत एकूण 272 मतदार होते. त्यापैकी 4 मतदार वगळता उर्वरित सर्व मतदारांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. या मतदारांमध्ये अमरावतीचे रहिवासी तसेच अकोला, नागपूर, पुणे, भोपाल, हैदराबाद, यवतमाळ आणि खामगाव आणि शहरातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 7 वाजता मतमोजणी सुरू होवून रात्री 1.30 वाजेपर्यंत पूर्ण झाली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक अधिकार्‍यांनी या निवडणुकीचे निकाल जाहीर केले. त्यानुसार श्री अग्रसेन नवनिर्माण पॅनलचे 21 पैकी 17 उमेदवार विजयी झाल्याचे जाहिर केले. तर, महाराजा अग्रसेन परिवर्तन पॅनलच्या 4 उमेदवारांना विजयी घोषीत करण्यात आले. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानुसार श्री अग्रसेन नवनिर्माण पॅनेलचे उमेदवार आणि दैनिक अमरावती मंडल व मातृभूमिचे संपादक अनिल जुगलकिशोर अग्रवाल यांनी श्री अग्रसेन स्मारक समितीच्या अध्यक्षपदासाठी 162 मते मिळवून विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार परमानंद रामावतार सिंघानिया यांना 107 मते मिळाली. याशिवाय उपाध्यक्षपदी अग्रसेन नवनिर्माण पॅनेलचे राजेंद्र बिहारीलाल अग्रवाल यांनी दोनपैकी एक तर परिवर्तन पॅनलचे वीरेंद्र भालचंद्र गणेडीवाल यांनी बाजी मारली. कोषाध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे कैलास मोतीलाल ककरानिया यांची निवड झाली. याशिवाय 17 कार्यकारिणी सदस्य पदांवर गजेंद्र शिवप्रसाद केडिया, संजय देवेंद्रकुमार अग्रवाल (पूनम), भरत श्रीराम अग्रवाल, शशिकांत मधुसूदन झुनझुनवाला, अग्रसेन नवनिर्माण पॅनेलचे हनुमान कोषाध्यक्षपदी, रामचंद्र अग्रवाल, मनीष विजय अग्रवाल (धामोरीवाला), प्रशांत घनश्यामदास अग्रवाल (भिवसरिया), डॉ.सतीश विेशनाथ अग्रवाल, राजेश मोहनलाल अग्रवाल, श्रीराम गोवर्धनदास नांगलिया, राजेंद्र मदनलाल केडिया, संकेत सतीश गोयंका, सुनील नवरंगलाल केडिया व कैलास जीवनराव केडिया, तसेच परिवर्तन पॅनेलचे बजरंगलाल अग्रवाल (चुडीवाला), संजय श्यामलाल नांगलिया विजयी झाले आहे. मतमोजणी प्रक्रिया निवडणूक अधिकारी दिपक अग्रवाल, अनिल नरेडी आणि नंदकिशोर कलंत्री यांनी निवडणूक अधिकारी म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी पार पाडली.

संबंधित बातम्या

Back to top button