शहरातील अन्नकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण बैठक

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

* हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात आयोजित संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा

अमरावती /26 डिसेंबर : शहरामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यवसाय, कॅन्टीन, होस्टेल, हॉकर्स व हातगाडी व्यवसायिक यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात हॉटेल वेस्ट / शिजवलेले अन्न / किचन वेस्ट तसेच ओला व सुका व इतर ओला व सुका कचरा निर्माण होत आहे.
सदर कचर्‍याची विल्हेवाट काही ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016, तसेच स्वच्छ भारत अभियान (डइच्) 2.0 च्या नियमानुसार न करता इतरत्र टाकण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे सार्वजनिक स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरी घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016, तसेच स्वच्छ भारत अभियान (डइच्) 2.0 अंतर्गत शहरातील सर्व आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याने दिनांक 26/12/2025 रोजी अमरावती महानगरपालिकेत हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशन अध्यक्ष श्री रविंद्र सलुजा, हॉटेल, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बियर बार, लॉन्स, केटरिंग व्यवसाय, कॅन्टीन, होस्टेल, तसेच सदर बैठकीस ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक, अन्न संकलन व वितरण करणार्‍या फूड बँक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, हॉटेल वेस्ट कंत्राटदार सुपरवायझर श्री शक्ती दीक्षित, श्री श्याम कथे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात झालेले निर्णय- बैठकीमध्ये शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, बीअर बार, केटरिंग व्यवसाय, होस्टेल, कॅन्टीन तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारे हॉकर्स व हातगाडी व्यवसायिक यांच्यामार्फत निर्माण होणार्‍या हॉटेल वेस्टबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणार्‍या सर्व बल्क वेस्ट जनरेटर / आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनांमधून निघणारा कचरा ओला व सुका कचरा वेगवेगळा करून वर्गीकृत स्वरूपात ठेवणे बंधनकारक राहील. हॉटेल वेस्ट / किचन वेस्टसाठी स्वतंत्र कंटेनर ठेवणे आवश्यक राहील. पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, डिस्पोजेबल साहित्य इत्यादी सुक्या कचर्‍यासाठी स्वतंत्र कंटेनर ठेवणे बंधनकारक राहील.
ज्या ठिकाणी हॉकर्स झोनमध्ये छोटे हातगाडीवर अन्न पदार्थ विकतात त्या एरिया निर्धारित करून त्या ठिकाणी मोठे ड्रम ठेवण्याची व्यवस्था हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट या कंत्राटदारांनी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. मंगल कार्यालये व लॉन्समध्ये कार्यक्रमानंतर उरलेले चांगले अन्न इतरत्र न फेकता सेवाभावी अन्न वितरण संस्थांमार्फत गरजू नागरिकांना वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी पुढे येणार्‍या अन्न संकलन व वितरण करणार्‍या फूड बँक सेवाभावी संस्थाची नोंद अमरावती महानगरपालिकेत करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार मनपातर्फे कोल्ड चेन मेन्टेनकरीता (फ्रीज) उपलब्ध करून देण्यात येईल असे आयुक्तांनी निर्देश दिले.
सर्व हॉटेल, मंगल कार्यालये, लॉन्स, कॅन्टीन व खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या हॉकर्स यांनी मनपा नियुक्त हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट कंत्राटदारालाच हॉटेल वेस्ट देणे बंधनकारक राहील. कचरा इतरत्र टाकल्यास नागरी घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 व स्वच्छ भारत अभियान (डइच) 2.0 अंतर्गत संबंधित आस्थापनांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे मा.आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. व्यावसायिक भागात मनपा मार्फत दिवसातून दोन वेळा घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा संकलन करणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालये व लॉन्स येथे कार्यक्रमाच्या दिवशी हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट करणारे कंत्राटदार गोविंदा नागरिक सेवा सहकारी संस्था यांनी दिवसातून एक वेळा वाहन पाठवून हॉटेल वेस्ट व त्याअनुषंगाने निर्माण झालेला कचरा संकलित करण्यात यावा.
शहरातील भाजी मंडीमधून निर्माण होणारा ग्रीन वेस्ट तसेच मंदिरांमधून निर्माण होणारे निर्माल्य उचलण्याची जबाबदारी संबंधित हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट कंत्राटदारावर राहील. आवश्यक त्या ठिकाणी ड्रम ठेवण्यास यावे असे आयुक्तांनी निर्देश दिले.
वरील प्रमाणे सर्वच आस्थपनेला जनजागृती व्हावी म्हणून हस्त पत्रके तयार करून सर्वच आस्थपनेला वितरित कारवाई व त्यांचे कडून वर्गीकृत कचरा गोळा करण्याकरिता आस्थपनेला सांगावे या बाबत टीम तयार करून त्या मध्ये जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक, हॉटेल मॅनेजमेंट कंत्राटदाराचे प्रतिनिधी, खएउ टीम चे प्रतिनिधी राहील असे मा.आयुक्तांनी निर्देश दिले.
वरील प्रमाणे सर्वच आस्थपणा हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट च्या अनुषंगाने मनपा मध्ये रजिस्टर होण्याकरिता ऋऊ- विभागाकडून यादी घेण्यात घेण्यात आलेली आहे व त्यानुसार सर्वच आस्थापनेतून हॉटेल व इतर वेस्ट उचलण्याचे अमरावती शहर स्वच्छ, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सर्व संबंधित आस्थापनांनी अमरावती महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button