हॅपी स्ट्रीट्स उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध

मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह

आनंद आणि फिटनेसची मेजवानी

अमरावती /30 नोव्हेंबर – अमरावती महानगरपालिकेच्या वतीने तसेच आयुक्त व प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या सक्रिय उपस्थितीत रविवारी, 30 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट्स उपक्रमाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली होती. आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, कला आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम असलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरला होता. शहरातील नागरिकांसाठी निरोगी जीवनशैलीचे महत्त्व आणि रस्त्यावरील खुल्या प्रांगणाचा सकारात्मक वापर या उपक्रमातून अधोरेखित झाला. स्टेज-1 : धावपटूंनी वाढवली कार्यक्रमाची शोभा-पहाटे 6 वाजता -ाीर्रींरींळ ठेरव र्ठीपपशीी गटाने 20 किमी धावण्याची प्रभावी सुरुवात करून हॅपी स्ट्रीट्सला दमदार प्रारंभ मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी 2.5 + 2.5 किमी अशी आणखी एक फेरी पूर्ण करत उपस्थितांसाठी फिटनेसची प्रेरणादायी उदाहरणे निर्माण केली. यानंतर 6.30 वाजता संदीप मंडाले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र घेण्यात आले. शांततेने आणि चैतन्याने भारलेल्या या योगाभ्यासात अनेक नागरिकांनी भाग घेतला. सकाळी 7.00 ते 7.50 या वेळेत कविता शेंडे आणि विजयालक्ष्मी यादव यांच्या झुंबा वर्कआउटने वातावरण अक्षरशः रंगून गेले. जोशपूर्ण संगीत, तालावर थिरकणारी गर्दी आणि उत्साह यामुळे परिसर उत्सवाच्या वातावरणात न्हाऊन निघाला. 7.50 ते 8.00 वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या स्वच्छ अमरावती – सुंदर अमरावती या संदेशावर आधारित पथनाट्याने जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. दिशा संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेले हे पथनाट्य नागरिकांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाबद्दल सकारात्मक संदेश पसरवणारे ठरलेयानंतर विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. धावपटूंच्या 3 स्पर्धकांचा आणि सायकलिंग क्षेत्रातील 8 जणांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा गौरव करण्यात येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे अभिनंदन केले. स्टेज-2 : योग, मजेशीर खेळ आणि स्लो सायकलिंगचा अनोखा मिलाफ दुसर्‍या स्टेजवर -7.15 वाजल्यापासून प्रेक्षक आणि नागरिकांना सहभागी करून घेणारे 10 मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या सर्व वयोगटातील लोकांनी हशा-टाळ्यांच्या गजरात आपला उत्साह व्यक्त केला. 7.30 वाजता Cycling -ssociation  च्या सायकलपटूंनी स्लो सायकलिंगचे अनोखे कौशल्य सादर केले. सायकलवर संतुलन राखत दाखवलेल्या विविध कलाबाज्यांनी उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. संगीत, कलाविष्कार आणि मर्दानी खेळांची रंजक मेजवानी-तिसर्‍या स्टेजवर 6.30 पासून ऋषिकेश होले यांच्या लाइव्ह आर्केस्ट्राने वातावरण संगीताच्या सुरांनी भारून गेले. भक्तीगीतांपासून ते हलक्या-फुलक्या गाण्यांपर्यंत विविध रचना सादर होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. यानंतर फिजिकल फिटनेस अँड सेल्फ-डिफेन्स ट्रेनिंग सेंटर, बडनेरा यांच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लाठी-काठी, दानपट्टा, गटका (भवरा) यांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण पाहून उपस्थितांची दाद थांबत नव्हती. या खेळांमधून भारतीय पारंपरिक युद्धकलेचे सौंदर्य आणि शौर्य उत्तमरीत्या समोर आले.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग – हॅपी स्ट्रीट्स झाले ‘हॅपी मोमेंट्स’-या उपक्रमात कुटुंबासह सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांनी अनेक कार्यक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मुलांच्या खेळण्याचा आनंद, तरुणांचा उत्साह, ज्येष्ठांचा योगाभ्यास आणि फिटनेसप्रेमींची उपस्थिती यामुळे हॅपी स्ट्रीट्स उपक्रम खर्‍या अर्थाने निरोगी अमरावतीचा संदेश देणारा ठरला. मनपाने आखलेल्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध रित्या पार पडला. नागरिकांना खुले रस्त्यावर सुरक्षितपणे व्यायाम, कला, खेळ आणि मनोरंजनाचे स्वातंत्र्य देण्यासाठी हा उपक्रम पुढेही असाच जोमात सुरू राहणार असल्याची माहिती मनपामार्फत देण्यात आली.
अमरावतीतील सकाळ पूर्वी कधीच इतकी रंगतदार आणि ऊर्जादायी नव्हती. हॅपी स्ट्रीट्सने अमरावतीकरांना दिला एक अविस्मरणीय अनुभव!अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी मनोगत करतांना म्हटले की, हॅपी स्ट्रीट्स सारखा उपक्रम अमरावतीसारख्या प्रगतिशील शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहाटेपासून नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मनापासून आनंद झाला. कुटुंबासह मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले, धावले, सायकल चालवली, योगाभ्यास केला, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला-हे सर्व पाहून ‘निरोगी अमरावती’चे स्वप्न अधिक दृढ झाले आहे. शहरातील रस्ते ही फक्त वाहतुकीची साधने नसून त्यांचे सार्वजनिक जीवन समृद्ध करणारे खुले प्रांगण आहे, याची अनुभूती आज सर्वांना मिळाली. फिटनेस, आनंद, सामाजिक संदेश आणि एकी यांचा संगम ज्या प्रकारे हॅपी स्ट्रीट्समध्ये दिसला, तो खरोखरच प्रेरणादायी आहे. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आयुक्तांनी सर्व नागरिकांचे मन:पूर्वक आभार मानते. अशा उपक्रमांतून आपल्या शहराचा सकारात्मक चेहरा अधिक उजळत आहे. यावेळी आयुक्तांनी सर्व अमरावतीकरांना आवाहन केले की- निरोगी जीवनशैली स्विकारावी, नियमित व्यायाम, योग, धावणे यांना दैनंदिन जीवनात स्थान द्यावे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षित वाहतूक यांचा नेहमी आदर्श ठेवावा. अशा सामूहिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात सक्रिय भूमिका बजावावी. हॅपी स्ट्रीट्स हा फक्त कार्यक्रम नसून समृद्ध, उत्साही आणि आरोग्यदायी अमरावतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा नागरी उपक्रम आहे-यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपल्या सहभागामुळेच अमरावती अधिक सुंदर, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी शहर बनेल. चला, निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल-हॅपी स्ट्रीट्ससोबत! या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, पोलीस उपायुक्त शाम घुगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, जयंत कौलगीकर, कविता शेंडे आणि त्यांचा झुंबा ग्रुप, प्रसिद्ध निवेदक अक्षय गावंडे, अपूर्व डाखोडे, शितल डाखोडे , निवेदिता कौलगीकर, इतरही कलाकार, मोनी, एच व्ही पी एम जिमनास्टीक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button