अमरावती जीएमसीला नवा ऊर्जावान डीन

डॉ. नंदकिशोर राऊत यांची अमरावतीत बदली,

* राज्यातील 13 वैद्यकीय महाविद्यालयांत मोठे फेरबदल

अमरावती / 5 नोव्हेंबर – राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाने मंगळवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत 13 सरकारी वैद्यकीय महाविद्या लयांच्या अधिष्ठात्यांच्या बढत्या आणि बदल्या जाहीर केल्या. या बदल्यांमध्ये अमरावती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता म्हणून डॉ. नंदकिशोर राऊत यांची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. राऊत हे नागपूर आरोग्य महामंडळात कार्यरत होते. त्यांच्या प्रभावी प्रशासकीय कौशल्यामुळे आणि कार्यक्षमतेमुळे त्यांना अमरावतीत बढतीसह बदली देण्यात आली आहे. ते लवकरच विद्यमान अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. मूळचे वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असलेले डॉ. राऊत हे नेत्ररोगतज्ज्ञ असून, त्यांनी गोंदिया व नागपूर येथे व्याख्याते म्हणून अनेक वर्षे सेवा दिली आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे त्यांना एक कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेले अधिकारी म्हणून ओळख मिळाली आहे. अमरावती जीएमसीत त्यांच्या आगमनाने वैद्यकीय व्यवस्थापन आणि रुग्णसेवेत नवीन ऊर्जा आणि नियोजनबद्ध दिशा मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या फेरबदलांमध्ये डॉ. एस.एम. सोनुने यांना अकोल्यात कायम ठेवण्यात आले असून, डॉ. प्रशांत उईके यांची यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे डीन म्हणून नियुक्ती झाली आहे. तर डॉ. एस. व्ही. आंबेकर यांची बदली पुण्याहून बुलढाणा जीएमसीमध्ये करण्यात आली आहे.
राज्यातील फेरबदलांमध्ये नवीन जिल्हा अधिष्ठाता म्हणून अमरावती डॉ. नंदकिशोर राऊत, अकोला डॉ.एस.एम. सोनुन, भंडारा डॉ. सुजाता जगताप-दुधगावकर, यवतमाळ डॉ. प्रशांत उईके, बुलढाणा
डॉ. एस. व्ही. आंबेकर, गोंदिया डॉ. कुसुमाकर घोरपड, नांदेड डॉ. सुधीर देशमुख, जालना डॉ. सईदा अफरोज फातिमा, मीराज डॉ. प्रकाश गुरव, मुंबई डॉ. जितेंद्र देशमुख, धुळे डॉ. एम. आर. मोगरेकर,

 

संबंधित बातम्या

Back to top button