अमरावतीत 71 वी आमदार चषक विदर्भ कबड्डी स्पर्धा

वरिष्ठ गट पुरुष व महिला संघांचा सहभाग

-4 ते 6 जुलै दरम्यान क्रीडा संकुलात आयोजन
अमरावती / 2 जुलै: अ‍ॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूर यांची मान्यता असलेल्या अमरावती महानगर कबड्डी (संघ) असोसिएशनच्या अमरावतीच्या यजमानपदाखाली 71 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला आमदार चषक कबड्डी स्पर्धा 4 ते 6 जुलै दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत विदर्भातील सर्व प्रमुख महिला व पुरुषांचे संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता विदर्भाचा संघ सुध्दा निवडला जाणार आहे.
या विदर्भ राज्यस्तरीय स्पर्धेत आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. स्पर्धेनिमीत्त संपूर्ण राज्यभरातून सुमारे 600 हून अधिक खेळाडू, पंच, प्रशिक्षक, मार्गदर्शक हे अमरावतीत येत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 5 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार तसेच महाराष्ट्र विधीमंडळाच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, राजेश वानखडे आणि प्रविण तायडे तसेच अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव ए. उसी रेड्डी उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार व विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामदास तडस, विदर्भ संघाचे सचिव प्रदिपसिंग ठाकूर, अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर व माजी नगरसेवक वसंतराव साऊरकर यांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेचे बक्षिस वितरण 6 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री प्रविण पोटे, माजी खासदार नवनित रवि राणा, आमदार उमेश यावलकर, कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव ए. उसी रेड्डी, माजी खासदार रामदास तडस, प्रदिपसिंहजी ठाकूर, माजी महापौर विलास इंगोले, भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, भाजपा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूरच्या रेफ्रीबोर्डाचे अध्यक्ष सतिष इखार यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेसाठी येणार्‍या खेळाडू, पंच, प्रशिक्षक महिला व पुरुष यांची निवास व भोजन व्यवस्था आयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे. आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.
अमरावती महानगर कबड्डी (संघ) असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तु. गुल्हाने, सचिव नितीन सराफ, कार्याध्यक्ष संदीप इंगोले, उपाध्यक्ष अतुल इंगोले, योगेश भोसले, कोषाध्यक्ष मिलींद पाटील, सहसचिव राजेश गाडे यांच्यासह कार्यकारीणी सदस्य मिलींद बांबल, धनराज यादव, शरद गढीकर, गणेश वरुडकर, अतुल देशमुख, सतिष ठाकूर, निलेश सराफ, राजेंद्र तुळे, सचिन मेहरे आदी स्पर्धेच्या यशस्वितेकरीता कार्यरत आहे. स्पर्धेसाठी स्वागत समितीचेही गठण करण्यात आले असून त्यात राजाभाऊ यादगिरे, जयंत कलोती, दीपक गुल्हाने, सुनिल गोगटे, सुरेंद्र चिखलकर, प्रदिप वानखडे, मिलींद बांबल, आप्पासाहेब देशमुख, राजु महल्ले, सुनिल वानखडे, सुरेश दम्माणी, सर्जेराव भिडे यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button