आरोपी सुशिल अभ्यंकर 17 दिवसानंतर निलंबित
अंजनगाव सुर्जी पेपरफुटी प्रकरणातील

अंजनगाव सुर्जी/18 मार्च : संपूर्ण राज्यात खळबळ माजवून देणार्या 27 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शालांत परीक्षा पेपरफुटी आणि चोरी प्रकरणातील फरार असलेला दुसरा आरोपी सुशिल अभ्यंकर ला अखेर 17 दिवसांनंतर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत निलंबित चा आदेश काढला आहे.
अंजनगाव सुर्जी येथे 27 फेब्रुवारी 2026 रोजी कस्टडी मध्ये हा प्रकार उघडकीस आला. इंग्रजी पेपर दरम्यान दोन विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका मध्ये भरारी पथकाला अनियमितता आढळली होती. तपासात हे प्रकरण केवळ उत्तर पत्रिका चोरी पुरतेच नसून संगनमताने झालेल्या गैरप्रकारा कडे निर्देश करत असल्याचे स्पष्ट झाले. या धक्कादायक प्रकारानंतर पोलीसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात संबंधित असणार्यावर विविध कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्राथमिक पुराव्यानुसार त्यांच्यावर संशयाची सुई थेट फिरली आणि अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाचा आदेश काढला. निलंबित शिक्षक सुशिल अभ्यंकर ला आता चिखलदरा पंचायत समिती शिक्षण विभागात मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले असून परवानगी शिवाय हलता येणार नाही. दरम्यान या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या पेपरफुटी प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी.आर. गिरासे हे अंजनगाव सुर्जी पंचायत समितीत कार्य करीत असताना गिरासे यांना कोणत्याही एखाद्या प्रकरणात फसवण्यासाठी कुटनीतीचा वापर केला होता. नविन आदेशानुसार निलंबित अभ्यंकर यांना आता त्याच अधिकार्यांच्या देखरेखीखाली चिखलदरा पंचायत समिती शिक्षण विभागात कार्य करावे लागेल त्यामुळे आता बी.आर. गिरासे निलंबित विस्तार अधिकारी सुशिल अभ्यंकर यांना कशी वागणूक देतात याकडे शिक्षण विभागातील अधिकार्यांचे व कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.




