दारु पिण्याच्या वादातून युवकावर चाकूहल्ला

अमरावती /14 डिसेंबर : दारु पिण्याच्या वादातून दारु विक्रेत्याने एका युवकावर चाकुने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी बेनोडा जहागीर गावात घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गौतम हिरे (रा. बेनोडा, जहागिर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर भरत डोंगरदिवे असे जखमीचे नाव आहे.सागर व त्याचा भाऊ रुपेश आणि गावातील काही मजुर शुक्रवारी दुपारी शेतात काम करीत होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारासकाम आटोपल्यानंतर ते गावातील दारु विक्रता गौतम हिरेच्या घरी दारु पिण्याकरिता गेले. तेव्हा दारु पीत असतांना गौतमसोबत वाद झाला. त्यातून गौतमने सागरला मारहाण करीत घरातून बाहेर आणले आणि दुचाकीच्या डिक्कीमधून चाकू काढून त्याच्या मांडीवर मारला.

संबंधित बातम्या

Back to top button