भरधाव कारने तीन विद्यार्थिनींना उडवले

कठोरा मार्गावर पोटे कॉलेज समोर भीषण अपघात

* एका मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक

अमरावती /27 जानेवारी : शहरातील कठोरा रोडवरील पी आर पोटे कॉलेजसमोर एका बेफाम वेगाने येणार्‍या कारने तीन मुलींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एका विद्यार्थिनीची प्रकृती अतिशय गंभीर असून उर्वरित दोन मुलींनाही दुखापत झाली आहे. टाटा विस्टा कारच्या भीषण धडकेनंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाला तात्काळ ताब्यात घेतले असून पुढील तपास चक्रावून सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 31 डीव्ही 9121 क्रमांकाची पांढर्‍या रंगाची कार अत्यंत वेगवान स्थितीत अमरावती कडून कठोरा रस्त्याकडे जात होती. याच वाटेवरील पोटे पाटील कॉलेज परिसरातून कार जात असतांना याच दरम्यान रस्त्याच्या कडेला पायदळ फिरत असलेल्या तीन विद्यार्थिनी (मुलीं)ना या कारने भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी मुलींना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. यातील 2 मुलींना पोटे रोडवरील देशमुख हॉस्पिटल तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला रीम्स हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ह्या विद्यार्थींनी स्थानिक कॉलेजमध्ये शिकायला असून कुणी बुलढाणा, तर कुणी यवतमाळच्या असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे, चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून कॉलेज परिसरात यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button