सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचार्‍यांना न्याय मिळविण्यासाठी संकल्प यात्रा

संभाजी रेवाळे यांचा निर्धार

अमरावती/1 जानेवारी -सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी यांची सभा शेगाव येथे नवीन वर्षाचे पुर्वारंभी संपन्न झाली. सर्व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे, त्यांना आर्थिक लाभ मिळउन देणे यासाठी सेवानिवृतांना एका व्यासपिठावर आणण्याचा संकल्प यावेळी संभाजी रेवाळे यांनी घोषीत केला. विदर्भाचे दैवत श्रीसंत गजानन महाराज यांचा आशिर्वाद घेउन अमरावती जिल्हयातील सर्व तालुक्याचे ठिकाणी संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे.
या मधुन सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचार्यांचे मासिक पेन्शन तातडीने सुरु करणे,त्यांचे जीपीएफ, गटविमा, उपदान (ग्रज्युएटी), पेन्शन विक्री ( अंशदान राशी ) प्रस्ताव तातडीने मंजूर करणे,सेवानिवृत्तांचे उर्वरित उपदान मिळविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणे, पेन्शन विक्रीची कपात11 वर्षानंतर थांबविणे,उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ मिळविने,सर्व संवर्गातील शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळविणे,स्वग्राम प्रवास भत्ता मिळविणे, दुर्गम प्रोत्साहन भत्ता मिळविणे,
आदर्श शिक्षक पुरस्कार वेतनवाढ मिळविणे, निरोगी आरोग्याकरीता मार्गदर्शन करणे, सुखी जीवनाच्या आनंदा करीता सहकुटूंब सहलीचे आयोजन करणे, उर्वरित उपदानाकरीता न्यायालयात जिंकलेल्या सेवानिवृतांना न्याय मिळउन देणे, मय्यत सेवानिवृतांचे पाल्यांना अनुकंपा नोकरी मिळण्यास सहकार्य करणे, सेवानिवृता मधील गैरसमज दूर करून कायदेशिर मार्गदर्शन करणे ईत्यादी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. सेवानिवृतामध्ये अशा अनेक विषयाबाबत जागृती करून समस्या सोडविणे, प्रसंगी सेवानिवृत्तांचे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे मकसूद अली अध्यक्ष यांनी सांगीतले. सर्व तालुक्यातील शिक्षक, सेवानिवृत्त बंधू भगीनींनी सहभागी होण्याचे आवाहन रमेशजी मळसणे सरचिटणिस यांनी केले. या सभेस मकसूदअली अध्यक्ष तथा माजी गटशिक्षणाधिकारी, रमेश मळसणे शिक्षण विस्तार अधिकारी,संभाजी रेवाळे मार्गदर्शक तथा संचालक,सुरेंद्र पाथरे तालुकाध्यक्ष,विनोद टेंबे केंद्रप्रमुख, रमेश मेश्राम, गणेश अर्मळ माजी केंद्रप्रमुख,संजय ढिगवार माजी विस्तार अधिकारी,विजय तेलंगे,राजाभाउ भाकरे,ओंकार राऊत, अरुण धांडगे,धनराज राऊत,अनिल जगनाडे,संजय बाबरे,जयेश्वर बुरघाटे,संजय आमले, गौतम वानखडे, इलियास खानसर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button