लग्नात हुंडा घेणारे नामर्द

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं शेतकरी मेळाव्यात भाष्य

* शेतकर्‍यांच्या समस्यावर वेधले लक्ष

अकोला /12 ऑक्टोबर : मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी परखड मत मांडून म्हटले आहे की, “हुंडा घेणारे नामर्द आहेत” आणि जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल? हा सवाल त्यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निंबा फाटा येथे आयोजित सभेत केला. मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील अभिनेते म्हणून ओळख असलेले मकरंद अनासपुरे आपल्या चित्रपटातून अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करतात. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आणि नाना पाटेकरांनी एकत्रित ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. निंबा फाटा येथील कार्यक्रमात त्यांनी शेतकर्‍यांच्या अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले, देशात शेतकरी एकत्र न आले तर त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा मथळा त्यांनी मांडला. याशिवाय कापूस आणि सोन्याच्या भावातील तफावतीवरही त्यांनी सरकारला सवाल विचारला की, जर सोन्याचे भाव लाखांच्या वर गेले असतील, तर कापसाचा भाव अजूनही कमी का? दरम्यान, शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकर्‍यांकडून कर वसुली करू नये, अशीही त्यांनी आवाहन केले. तसेच शेतकर्‍यांना उद्योजकांचा दर्जा का नाही, हा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर चित्रपट अभिनेत्री गिरीजा ओक यांनीही सध्याच्या शेतकर्‍यांच्या अडचणीच्या परिस्थितीत सर्वांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभं राहावे, असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button