शेती विक्रीच्या नावाखाली 6.65 लाखांचा गंडा

एकाच जमिनीची दोनदा विक्री करून फसवणूक

* लोणी पोलिसांनी पाच जणांवर केला गुन्हा दाखल

अमरावती /13 जानेवारी : जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेती खरेदीच्या बहाण्याने 6 लाख 65 हजार रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच शेतजमिनीची दोन वेगवेगळ्या खरेदी खताद्वारे विक्री करून जालसाजांनी फिर्यादीची आर्थिक लूट केली.
या प्रकरणी अमरावती येथील संजय गांधी नगर रहिवासी शरद मारोतराव अंबोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींमध्ये राजू अर्जुनराव बावले, प्रमोद सुभाषराव ठाकरे (दोघेही रा. फुलआमला), गजानन ढवले (रा. सामरा नगर), नामदेवराव कापशीकर आणि एका महिलेचा समावेश आहे. सविस्तर वृत्तानुसार, आरोपींनी संगनमत करून शरद अंबोरे यांना शेती स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या प्रलोभनाला बळी पडून अंबोरे यांनी वेळोवेळी एकूण 6 लाख 65 हजार रुपये आरोपींना दिले. मात्र, व्यवहार पूर्ण झाल्यावर संबंधित शेतीची आधीच दुसर्‍या व्यक्तीला विक्री झाल्याचे आणि आरोपींनी एकाच जमिनीचे दोनदा व्यवहार केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच अंबोरे यांनी लोणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन राजू बावले, प्रमोद ठाकरे, गजानन ढवले, पंडित कापशीकर आणि एका महिलेवर 316 (2), 318 (2), 318 (4), 351 (2) आणि 3 (5) या कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
सावध राहा जमिनीचे व्यवहार करताना – जमीन खरेदी करताना सातबारा उतारा, फेरफार पत्रक आणि संबंधित जमिनीवर कोणताही बोजा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अमरावती परिसरात वाढत्या जमीन घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर, नोंदणी कार्यालयातील कागदपत्रांची अधिकृत पडताळणी केल्याशिवाय कोणालाही मोठी रक्कम देऊ नका. अनोळखी मध्यस्थांच्या प्रलोभनाला बळी पडल्यास आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
सट्टा बाजारात कमालीची …
गरम असणारा सट्टा बाजार यावेळी पूर्णपणे थंड पडला आहे. पोलीस आयुक्तांच्या धाकामुळे सट्टा बाजार बंद आहे की उमेदवारांच्या अनिश्चित भविष्यामुळे सट्टेबाज सावध आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सट्टा बाजारात अद्याप कोणाचेही दर निश्चित झाले नसल्याने ही शांतता कोणाला फळणार आणि विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खाकीचा वचक आणि सट्टा बाजारात चुप्पी-पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अवैध धंद्यांचे कंबरडे मोडल्याने शहरातील सट्टेबाज सध्या भूमिगत झाले आहेत. निवडणुकीत नेहमी सक्रिय राहणारा सट्टा बाजार यंदा पोलिसांच्या भीतीने शांत आहे. उमेदवारांची मोठी फौज मैदानात असल्याने कोणाचे पारडे जड आहे, हे स्पष्ट नसल्यामुळे सट्टा बाजाराने अद्याप चुप्पी साधली आहे. अखेरच्या दिवशी बाजारात काही हालचाली होतात की ही शांतता कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button